शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

दोन महिन्यांपूर्वीच उपजिल्हा रुग्णालयात रुजू झालेल्या एक्स-रे टेक्निशियनची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2021 18:41 IST

ही सुसाईड नोट पोलिसांनी ताब्यात घेतली असून पुढील तपास सुरु आहे

परळी ( बीड ) : येथील उपजिल्हा रुग्णालयातील एक्स-रे टेक्निशियनने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली आहे. सिद्धार्थ पंडितराव जाधव ( 33) असे मृताचे नाव असून एक सुसाईड नोट आढळून आली आहे. सिद्धार्थ जाधव हा हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील रहिवासी असल्याची माहिती आहे. 

दोन महिन्यापूर्वी येथील उपजिल्हा रुग्णालयात सिद्धार्थ जाधव हे नोकरीस रुजू झाले होते. मंगळवारी सकाळी नऊ वाजता ड्युटीला न आल्याने त्यांना आरोग्य कर्मचाऱ्यांनी फोन केला असता फोन उचलला गेला नाही. नंतर त्यांच्या घरात जाऊन पाहणी केली असता गह्रातील पंख्यास गळफास घेतलेल्या अवस्थेत सिद्धार्थ आढळून आले. 

या घटनेची खबर संभाजीनगर पोलिसांना कळवताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली .येथील उपजिल्हा रुग्णालय कर्मचारी वसाहतीत सिद्धार्थ जाधव राहत होते .परळी ग्रामीण पोलीस निरीक्षक सुरेश चाटे, ठाकूर, मंठाळे,विलास देशमुख यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. दरम्यान, सिद्धार्थ जाधव यांच्या खिशात एक चिठ्ठी आढळून आली आहे. त्यात 'मम्मी-डॅडी मला माफ करा' असा मजकूर असल्याची माहिती आहे. ही सुसाईड नोट पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

टॅग्स :Deathमृत्यूBeedबीड