शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

पीकविम्याचे पैसे देण्यास नकार दिल्याने वडिलांचा काढला काटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 17:29 IST

हत्या केल्यानंतर पायऱ्यावरून पडल्याचा केला होता बनाव 

बीड : पीकविमा आणि इतर शेतकी अनुदानाचे खात्यावर जमा झालेली दहा हजारांची रक्कम देण्यास नकार दिल्याने चिडलेल्या मुलाने वडिलांच्या डोक्यात लोखंडी पहार मारून त्यांचा खून केला. दोन महिन्यापूर्वी धारूर तालुक्यात घडलेल्या या घटनेत बुधवारी मुलावर खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.

आश्रुबा कारभारी मुंडे (वय ७४, रा. अशोक नगर, धारूर) असे मयत पित्याचे नाव आहे. २१ जानेवारी रोजी डोक्याला मार लागल्याने त्यांना अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. घरात पायऱ्या चढत असताना पाय घसरून पडून डोक्याला चॅनल गेट लागल्याने वडील जखमी झाल्याचे आश्रुबा यांचा मुलगा बलभीम याने त्यावेळी पोलिसांना सांगितले होते. उपचारादरम्यान दुसऱ्या दिवशी आश्रुबा यांचा मृत्यू झाला. परंतु, मृतदेहावरील खुणा पाहून हा काहीतरी वेगळाच प्रकार असावा, असा संशय पोलिसांना आला. त्यादृष्टीने त्यांनी तपास केला असता आश्रुबा आणि बलभीम यांच्यात अनुदानाच्या रकमेवरून जोरदार वाद सुरु होता, अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सखोल चौकशी केली असता बलभीम यानेच वडिलांचा खून केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

याप्रकरणी सहा. फौजदार राजाराम जाधव यांच्या फिर्यादीवरून बलभीमवर धारूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला. पोलिसांनी बलभीमला बेड्या ठोकल्या असून गुरुवारी दुपारी त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. पुढील तपास सहा. पोलीस निरिक्षक ज्ञानेश्वर कुकलारे हे करत आहेत. 

तत्कालील पोनि जाधव यांचे योगदान सुरुवातीस अकस्मात मृत्यूची नोंद झाल्यानंतर त्याचा तपास सहा.फौजदार राजाराम  जाधव यांच्याकडे देण्यात आला होता. त्यांनी पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अपर अधीक्षक अजित बोºहाडे आणि धारुरचे तत्कालीन पोलीस निरीक्षक अनिलकुमार जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहा. पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे यांच्या सहकार्याने तपास करून खुनाचा छडा लावला. अपघातात मृत झालेले पोलीस निरीक्षक अनिलकुमार जाधव यांनी वेळोवेळी तपासात मोलाचे मार्गदर्शन केल्याचे राजाराम जाधव यांनी सांगितले.

टॅग्स :MurderखूनPoliceपोलिसArrestअटक