शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

जन्मला मुलगा; मिळाली मुलगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 13:06 IST

जिल्हा रुग्णालयात मुलगा जन्मला. त्याची नोंदही झाली. प्रकृती खालावल्याने खाजगी रुग्णालयात हलविले. दहा दिवस उपचार झाले. सोमवारी सुटीच्या दिवशी मात्र हातात मुलगी पडली आणि नातेवाईकांना अश्चर्याचा धक्काच बसला.

ठळक मुद्देबीडमधील घटना बाळ स्वीकारण्यास नातेवाईकांचा नकार

बीड : जिल्हा रुग्णालयात मुलगा जन्मला. त्याची नोंदही झाली. प्रकृती खालावल्याने खाजगी रुग्णालयात हलविले. दहा दिवस उपचार झाले. सोमवारी सुटीच्या दिवशी मात्र हातात मुलगी पडली आणि नातेवाईकांना अश्चर्याचा धक्काच बसला. जिल्हा व खाजगी रुग्णालयातच आपल्या मुलाचा बदल केल्याचा आरोप करीत नातेवाईकांनी बाळ स्वीकारण्यास नकार दिला. या घटनेने खळबळ उडाली असून, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन कागदपत्र पडताळणी सुरु केली आहे.

छाया व राजू थिटे (रा.हिंगोली ह.मु.कुप्पा ता.वडवणी) हे दाम्पत्य कामासाठी मागील सात महिन्यांपूर्वी बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यात आले. उपळी येथील गोवर्धन चव्हाण यांच्याकडे त्यांनी साल धरले होते. ११ मे रोजी छाया यांना कळा सुरू झाल्याने त्यांना जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सायंकाळी ४.४५ वा. तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला.

परंतु वजन केवळ १ किलो ६०० ग्रॅम असल्याने त्याला अतिदक्षता विभागात ठेवले. येथे त्याच्यावर चार तास उपचार झाले.परंतु येथील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे व कामचुकारपणामुळे थिटे यांना बाळास खाजगी रूग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. त्यानंतर रात्री ९ वाजेच्या सुमारास बाळाला घेऊन ते शहर पोलीस ठाण्यासमोरील थोटे यांच्याकडे दाखल केले. तिथे उपचार झाल्यानंतर त्याला बसस्थानकासमोरील श्री बाल रूग्णालयात दाखल केले.

येथे डॉक्टरांनी बाळाच्या पायाचे ठसे व इतर पुरावे जवळ ठेवत त्याला दाखल करून घेतले.११ ते २१ मे असे दहा दिवस त्याने येथे उपचार केले. २१ मे रोजी सकाळी ८ वाजता त्याला सुट्टी झाली. आईच्या हाती बाळ देताच तो मुलगा नसून मुलगी असल्याचे समजले. यावेळी आईसह इतर नातेवाईकांना धक्काच बसला. त्यानंतर हा सर्व प्रकार इतर नातेवाईकांच्या कानी घातला. आपण मुलाला जन्म दिला असून आपले बाळ बदलल्याचा आरोप करीत नातेवाईकांनी श्री बाल रूग्णालयात ठिय्या मांडला. त्यामुळे काही वेळ तणाव निर्माण झाला होता.

शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सय्यद सुलेमान यांनी धाव घेत नातेवाईकांची समजूत काढून लवकर तपास लावण्याचे अश्वासन दिले. परंतु नातेवाईकांनी उशिरापर्यंत बाळ स्वीकारले नव्हते. याप्रकरणी पोलीस ठाण्यात रात्रीपर्यंत नोंद करण्यात आलेली नव्हती.

जिल्हा रुग्णालयात मुलाची नोंदजिल्हा रूग्णालयातील नोंदवही पाहिली असता तिथे मुलगा असल्याची नोंद आहे. तर खाजगी रूग्णालयात स्त्री असल्याची नोंद आहे. त्यामुळे नेमका बदल कोठे झाला, असा सवाल उपस्थित केला जात असून तर्कवितर्क काढले जात आहेत.

डॉक्टरांनी अदलाबदल केली

आम्हाला मुलगा जन्मला होता. डॉक्टरांनीच आमच्या मुलाची अदलाबदल केली आहे. याचा तपास करून आमचे बाळ आम्हाला परत द्यावे. - राजू थिटे, पालक

टॅग्स :doctorडॉक्टरBeed civil hospitalजिल्हा रुग्णालय बीडWomenमहिला