शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

असाही एक ‘रोझ डे’; गुलाबाऐवजी लोकसहभागातून ‘दामिनी’ला दुचाकी भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2019 00:19 IST

‘व्हॅलेंटाईन वीक’ला सुरूवात झाली आहे. गुरूवारी ‘रोझ डे’ होता. या दिवशी गुलाब दिला जातो. मात्र, बीडमधील दानशुरांनी गुलाब देण्याऐवजी छेडछाड रोखण्यासाठी नियुक्त केलेल्या दामिनी पथकाला दुचाकींची भेट दिली आहे.

ठळक मुद्देआदर्श संकल्पना : छेडछाड रोखण्यासाठी दुचाकीवरून पोलिसांची जिल्हाभर राहणार गस्त

बीड : ‘व्हॅलेंटाईन वीक’ला सुरूवात झाली आहे. गुरूवारी ‘रोझ डे’ होता. या दिवशी गुलाब दिला जातो. मात्र, बीडमधील दानशुरांनी गुलाब देण्याऐवजी छेडछाड रोखण्यासाठी नियुक्त केलेल्या दामिनी पथकाला दुचाकींची भेट दिली आहे. बीडमध्ये असाही ‘रोझ डे’ साजरा केल्यानंतर याची चर्चा दिवसभर शहरात होती. बीड पोलिसांनी राबविलेला हा उपक्रम राज्यात अव्वल राहणार आहे. याच दुचाकीवरून दामिनी पथके आता जिल्हाभर गस्त घालणार असल्याने महिला, मुलींमधून समाधान व्यक्त होत आहे.शाळा, महाविद्यालयात जाताना रस्त्यावर उभा राहून किंवा पाठलाग करून रोडरोमिओ मुलींची छेड काढतात. तसेच रात्री, अपरात्री एकटी महिला, मुलगी पाहून तिला टाँट मारणे, अश्लील भाषा वापरणे, छेड काढण्यासारखे प्रकार केले जातात. हाच धागा पकडून जिल्ह्यात १२ दामिनी पथकांची नियुक्ती केली. जिल्हाभर जनजागृतीसह छेड काढणाऱ्या रोमिओंना पकडून चोप दिला. आता यामध्ये आणखी सुधारणा व्हावी, मुलींमध्ये विश्वास निर्माण व्हावा, यासाठी प्रत्येक पथकाला एक दुचाकी देण्याची संकल्पना जिल्हा पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी व्यक्त केली. याला बीडकरांमधून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्रत्येक तालुक्यातून एक दुचाकी पथकाला भेट देण्यात आली. याचे वाटप गुरूवारी करण्यात आले.इकडे गुलाब देऊन तरूण प्रेमाचा ‘इजहार’ करीत होते, तर दुसºया बाजूला पोलीस आणि नागरिकांनी एकत्र येत आदर्श उपक्रम हाती घेतला. अपर पोलीस महासंचालिका डॉ. प्रज्ञा सरवदे यांच्या हस्ते दुचाकींचे वाटप तसेच मान्यवरांच्या हस्ते बीड पोलिसांनी काढलेल्या कालदर्शिकेचे प्रकाशनही झाले. यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक प्रकाश मुत्याल, पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, जालनाचे अधीक्षक एस.चैतन्य, उस्मानाबादचे अधीक्षक आर. राजा, औरंगाबाद ग्रामीणच्या अधीक्षिका आरती सिंह, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, अजित बोºहाडे, उपअधीक्षक सुधीर खिरडकर, भास्कार सावंत, श्रीकांत डिसले, पोनि घनश्याम पाळवदे, राजीव तळेकर, भाऊसाहेब पाटील, पोउपनि भारत माने आदींची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.प्रशांत जोशी यांनी केले.

टॅग्स :BeedबीडBeed policeबीड पोलीस