शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
6
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
7
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
8
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
9
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
10
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
11
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
12
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
13
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
14
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
15
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
16
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
17
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
18
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
19
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती

समाजकल्याणच्या ४६ आश्रमशाळा होणार ‘डिजिटल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 00:24 IST

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत असणाऱ्या जिल्ह्यातील ४६ शाळा यावर्षी डिजीटल झाल्या आहेत. यावर्षीपासून या शाळांमध्ये सेमी इंग्रजीची सुविधा देण्यात आली असून परिसरात तंबाखू, गुटखाबंदीही करण्यात आली.

ठळक मुद्देसेमी इंग्रजीचीही सुविधा : गुणवत्ता वाढवून महाराष्ट्रात बीड जिल्ह्याचे नाव उंचावणार

बीड : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत असणाऱ्या जिल्ह्यातील ४६ शाळा यावर्षी डिजीटल झाल्या आहेत. यावर्षीपासून या शाळांमध्ये सेमी इंग्रजीची सुविधा देण्यात आली असून परिसरात तंबाखू, गुटखाबंदीही करण्यात आली. सहायक आयुक्त डॉ.सचिन मडावी यांनी मंगळवारी सर्व मुख्याध्यापकांची बैठक घेऊन यासंदर्भात सूचना केल्या आहेत. यामुळे आश्रमशाळांची गुणवत्ता वाढणार असून बीड जिल्ह्याचे नाव महाराष्ट्रात उंचावणार आहे.जिल्ह्यातील सर्व आश्रमशाळांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलावा तसेच विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढून त्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, या उद्देशाने आयुक्त डॉ.मडावी यांनी हा निर्णय घेतला आहे. मंगळवारी त्यांनी याबाबत तातडीची सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांची बैठक बोलावून मार्गदर्शन व आदेश दिले. यामध्ये शाळेच्या १०० मीटर परिसरात तंबाखू, गुटखा बंदी, शाळा रंगरंगोटी करणे, सकाळी ९ ते सायंकाळी साडे चार यावेळेत शाळा सुरू ठेवणे, सर्व शिक्षक, विद्यार्थ्यांना गणवेश बंधनकारक करणे आदींचा समावेश आहे. पहिल्यांदाच अशाप्रकारे आश्रमशाळांचा कायापालट होत असून या शाळांमध्ये सेमी इंग्रजीचे शिक्षण मिळणार असल्याने विद्यार्थ्यांची संख्याही वाढणार आहे. तसेच त्यांची गुणवत्ता वाढून जिल्ह्याचे नावही उंचावणार आहे.शनिवारी दप्तरमुक्त शाळाया आश्रमशाळांमध्ये प्रत्येक शनिवारी एकही विद्यार्थी दप्तर घेऊन येणार नाही. तसेच प्रत्येक महिन्याला सामान्य ज्ञान चाचणी घेण्यात येणार आहे.यासह सांस्कृतिक, सामाजिक उपक्रमांसह विविध कार्यक्रम घेतले जाणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी वाढेल, असा विश्वास सहा.आयुक्त डॉ.सचिन मडावी यांनी व्यक्त केला.

टॅग्स :BeedबीडEducation Sectorशिक्षण क्षेत्र