शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार करून बहिणीवर तलवारीने हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2019 18:34 IST

पिडीत मुलीच्या १३ वर्षीय बहिणीवर तलवारीने प्राणघातक हल्ला केला

गेवराई (जि.बीड) : घराजवळ कोण आहे, हे पाहताना एका १५ वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला. दरम्यान, हा प्रकार पाहणाऱ्या सदर मुलीच्या १३ वर्षीय बहिणीवर तलवारीने प्राणघातक हल्ला केल्याची घटना २० जून रोजी तालुक्यातील नागझरी येथे रात्री बारा वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी पीडित मुलीच्या फिर्यादीवरुन २५ जून रोजी गेवराई पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तालुक्यातील एका गावात १५ वर्षीय मुलगी आपल्या बहिणीसोबत घरात होती. त्याचवेळी २० जून रोजी रात्री १२ च्या सुमारास आपल्या घरासमोर कोणीतरी उभे आहे, हे पाहत असताना आरोपींनी तिचे तोंड दाबून घरामागे नेले. बहिणीचा आवाज ऐकू आल्याने तिची १३ वर्षीय बहीण त्या ठिकाणी गेली असता, आरोपींनी तिच्यावर तलवारीने वार केले. ती गंभीर जखमी झाली असून जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना घडल्यानंतर ५ दिवसांनी गेवराई ठाण्यात २५ जून रोजी मुलीच्या फिर्यादीवरुन  नारायण भारत पवार, पप्पु भारत पवार , देवगण विश्वास चव्हाण, शहादेव विश्वास चव्हाण व जावेद विश्वास चव्हाण  यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी : या प्रकरणी पीडितेला मेडिकलला पाठवले असून, या गुन्ह्याचा तपास योग्यरीतीने लावून गुन्ह्यातील आरोपीला अटक करण्यात येईल, असे तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अश्विनी कुंभारे यांनी सांगितले. बुधवारी बीड येथील जिल्हा रुग्णालयात पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. 

टॅग्स :Rapeबलात्कारPoliceपोलिसBeedबीड