शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

'साहेब, बायकोला मारून आलोय, अटक करा'; बीड जिल्ह्यातील खळबळजनक घटना

By सोमनाथ खताळ | Updated: August 22, 2023 15:52 IST

चारित्र्याच्या संशयावरून अंगणवाडी सेविका पत्नीचा खून करून पती पोलिस ठाण्यात

नेकनूर (जि. बीड) : चारित्र्यावर संशय घेत अंगणवाडी सेविका असलेल्या पत्नीच्या डोक्यात खोऱ्याचा दांडा मारून खून केला. त्यानंतर पती स्वत: पोलिस ठाण्यात आला. त्याने साहेब, मी बायकोला मारून आलोय, मला अटक करा, असे सांगताच पोलिसांची धावपळ सुरू झाली. ही घटना बीड तालुक्यातील धावज्याचीवाडी येथे मंगळवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली.

मंगल गोडीराम भोसले (वय ४५) असे मयताचे नाव असून गोडीराम हरिभाऊ भोसले (वय ५५) असे खून करणाऱ्या पतीचे नाव आहे. मंगळवारी सकाळी मंगल या शेतात गेल्या होत्या. याचवेळी तेथे गोडीराम ही आला. त्यांच्यात चारित्र्याच्या संशयावरून कडाक्याचे भांडण झाले. यातूनच गोडीरामने बाजूला पडलेल्या खोऱ्याचा दांडा पत्नी मंगलाच्या डोक्यात मारला.

यात काही क्षणातच त्या गतप्राण झाल्या. यानंतर गोडीराम नेकनूर पोलिस ठाण्यात पोहचला. तेथे उपस्थित अधिकाऱ्यांना त्याने आपण बायकोला मारून आल्याची कबुली दिली. पोलिसांनी खात्री केल्यानंतर त्याला ताब्यात घेतले. याप्रकरणी नेकनूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. दरम्यान, मंगल यांच्या पश्चात एक मुलगी व एक मुलगा असा परिवार आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीड