शहरं
Join us  
Trending Stories
1
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
2
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
3
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
4
"लढली ती...पण शेवटी कॅन्सरने तिचा घास घेतला", सुबोध भावेने सांगितल्या प्रिया मराठेच्या आठवणी
5
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
6
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
7
पत्नीला पळवून नेल्याचा राग अनावर झाला; कोल्हापुरात पतीने घरात घुसून तरुणाला संपवला
8
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
9
कुजबुज: मोहित कंबोज यांचा खरंच संन्यास की प्रसिद्धीसाठी स्टंट? ‘उँचे लोग, उँची पसंद’, पण...
10
अरे बापरे! घरात २ जण अन् १.६५ लाख लीटर पाण्याचं आलं बिल; भाडेकरूने मांडली व्यथा
11
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
12
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
13
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी
14
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
15
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
16
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
17
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
18
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
19
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
20
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात

झाडाचे गुण गात, गुण घेत पर्यावरणाचा उत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2020 23:38 IST

प्रभात बुडूख । लोकमत न्यूज नेटवर्क बीड : मी वड बोलतोय...असे वाक्य उच्चारताच उपस्थित विद्यार्थ्यांनी टाळ््यांचा गजर केला. मात्र, ...

ठळक मुद्देजगातील पहिले वृक्ष संमेलन : आज देखील मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन; विद्यार्थ्यांची उपस्थिती लक्षणीय

प्रभात बुडूख ।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : मी वड बोलतोय...असे वाक्य उच्चारताच उपस्थित विद्यार्थ्यांनी टाळ््यांचा गजर केला. मात्र, संमेलन अध्यक्ष असलेल्या वडाने सयाजी शिंदे यांच्या मुखातून आपली जन्माची व आयुष्याची व्यथा मांडण्यास सुरुवात करताच उपस्थित सर्व भावुक झाले. विनाश टाळायचा असेल तर वृक्ष संवर्धन किती महत्त्वाचे आहे हे जाणून घेण्याची आतुरता संमेलनस्थळावर उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये दिसून आली. पालवण येथील सह्याद्री देवराई परिसरात जगातल्या पहिल्या वृक्ष संमेलनाच्या निमित्ताने बीडसह राज्यभरातून आलेल्या पर्यावरणप्रेमींनी उत्सव साजरा केला.झाडे जगली तर मराठवाड्याचा वाळवंट होण्यापासून आपण रोखू शकतो. त्यामुळे झाडे लावा-झाडे जगवा, ‘झाडाचे गुण गाऊ, झाडाचे गुण घेऊ’ या श्लोगनचा जयघोष करीत १३ फेब्रुवारी रोजी जगातील पहिल्या वृक्ष संमेलनाचे थाटात उद्घाटन झाले.संमेलनासाठी आलेल्या सर्वांनी स्टॉलवर विविध विषयांची माहिती घेतली. यामध्ये वन विभाग व सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने वनक्षेत्राची व झाडांची माहिती देणारे स्टॉल उभारले होते. प्रगतशिल शेतकऱ्यांनी विकसित केलेली रोपं, फळझाडांची माहिती देणारे स्टॉल येथे होते. विद्यार्थ्यांमध्ये मोठा उत्साह होता. विविध माहिती ते जाणून घेत होते. शेकडो विद्यार्थी, तरूणांची लक्षणीय उपस्थिती पाहून या वृक्ष संमेलनात भावी पिढीला वृक्ष संवर्धनाचे धडे मिळणार असल्याच्या प्रतिक्रिया मान्यवरांनी दिल्या.वृक्ष संमेलनासाठी अनेकांचे दातृत्वजगातील पहिले वृक्ष संमेलन बीडमध्ये होत असल्याने शहरातील उद्योजक, व्यापारी महासंघ, औषध विक्रेता संघटना, सामाजिक कार्यकर्ते, पर्यावरणप्रेमींनी भोजन, निवास, परिसर नियोजन, पिण्याचे पाणी आदी विविध जबाबदाऱ्यांचे दायित्व स्वीकारत आयोजनाचा गोवर्धन उचलला.कापडी पिशवी व रोपांचे केले वाटपवृक्ष संमेलनस्थळावर आलेल्या प्रत्येकांना प्लास्टिक न वापरण्याचा संदेश याठिकाणी देण्यात आला होता. तसेच वृक्ष संमेलनात प्रत्येकाला पार्यावरणपूरक कापडी पिशवी व विविध रोपांचे वाटप करण्यात आले.गरूडाला निसर्गात सोडून होणार संमेलनाचा समारोपशुक्रवारी वृक्ष संमेलनाचा समारोप होईल. मान्यवरांचे मार्गदर्शन, वृक्ष सुंदरी व इतर स्पर्धांचे बक्षीस वितरण होईल. जखमी गरुडाची सुश्रूषा पूर्ण झाल्याने त्याला निसर्गात सोडून संमेलनाची सांगता होणार आहे.

टॅग्स :Beedबीड