नितीन कांबळे ।लोकमत न्यूज नेटवर्ककडा : आष्टी तालुक्यात शासकीय टँकरच्या माध्यमातून १७७ गावांसह अडीचशे वाडया-वस्त्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या सीना आणि मेहकरी धरणात आता १५ दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे.त्यामुळे येत्या काही दिवसात २ लाख ३५ हजार नागरिकांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.आष्टी तालुक्यात मागील तीन-चार वर्षांपासून पावसाअभावी दुष्काळी परिस्थिती उदभवत आहे. यावर्षी गावागावात चारा-पाण्याची मोठ्या प्रमाणात टंचाई निर्माण झाली आहे. डिसेंबरपूर्वीच लहान-मोठ्या प्रकल्पांसह विहीरी, हातपंपांनी तळ गाठला आहे.त्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिक भीषण पाणीटंचाईचा सामना करीत आहेत. सध्या १७७ गावासह वाडी-वस्त्यांना जेमतेम पाणीसाठा शिल्लक असलेल्या सीना, मेहकरी धरणातून दिवसाला १७५ शासकीय टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यात येत आहे.सीना - मेहकरी धरणातून दररोज टँकर भरण्यात येत असल्यामुळे दिवसेंदिवस पाणीपातळी घटत चालली आहे. १५ दिवस पुरेल एवढाच मृतसाठा शिल्लक असल्याचे नागरिक सांगतात. त्यामुळे धरणात पाणीच उपलब्ध नसेल तर टँकरमध्ये कुठून येणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. धरणात जो काही मृतसाठा शिल्लक आहे तो अशुध्द, गढूळ असल्याने पिण्यास योग्य नसल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे भविष्यात पाणीटंचाईने उग्ररूप धारण करू नये, म्हणून आतापासूनच पाण्याचे नियोजन करण्याची आवश्यकता आहे.अन्यथा पाणीटंचाईचं विदारक चित्र तालुका वासियांच्या वाट्याला येणार यात तिळमात्र शंका नसल्याचे दिसून येत आहे.
सीना, मेहकरी तलावात १५ दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 00:27 IST
आष्टी तालुक्यात शासकीय टँकरच्या माध्यमातून १७७ गावांसह अडीचशे वाडया-वस्त्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या सीना आणि मेहकरी धरणात आता १५ दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे.त्यामुळे येत्या काही दिवसात २ लाख ३५ हजार नागरिकांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.
सीना, मेहकरी तलावात १५ दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा
ठळक मुद्देअडीच लाख जनतेसमोर पाणीटंचाईचे भीषण संकट : १७७ गावांसह अडीचशे वाड्या-वस्त्यांना पाणीपुरवठा