स्वच्छतेकडे दुर्लक्ष
बीड : शहरात अनेक भागांमध्ये स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याने स्वच्छतेचा मोठा अभाव निर्माण झाला आहे. परिणामी, विविध आजार डोके वर काढत आहेत. अनेक भागांमध्ये नाले तुंबल्याने मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. स्वच्छतेची मागणी होत आहे.
बाजारकरूंना त्रास
बीड : तालुक्यातील चौसाळा येथील बाजार भरणाऱ्या परिसराची दुरवस्था झाली आहे. यामुळे भाजीविक्रेत्यांना तसेच नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. मागील अनेक दिवसांपासून बाजारतळाची दुरुस्ती करण्याची मागणी बाजारकरूंमधून केली जात आहे.
दुरुस्तीची मागणी
बीड : शहरातील मुख्य भागातील रस्त्यावर ठिकठिकाणी असलेले गतिरोधक दुरुस्तीला आले आहेत. गतिरोधक खराब झाल्याने गतीला आवरणे कठीण झाले आहे. यामुळे शहरात नव्याने गतिरोधक तयार करण्याची मागणी नागरिक, वाहनधारकांतून होत आहे.
भाज्यांचे भाव उतरले
बीड : ग्रामीण भागातून भाज्यांची आवक वाढल्याने दरांमध्ये घसरण झाली. टमाटे, बटाटे, पत्ताकोबी, फुलकोबी, फळभाज्यांचे दर कमी झाल्याने दिलासा मिळाला आहे.