शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
5
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
6
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
7
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
8
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
9
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
10
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
11
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
12
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
13
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
14
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
15
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
16
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
17
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
18
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
19
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
20
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा

सुटकेचा निश्वास ! आष्टी तालुक्यात धुमाकूळ घालणारा नरभक्षक बिबट्या अखेर जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2020 13:55 IST

नगर, औरंगाबाद, जळगाव, नाशिक, आष्टी येथील वनविभागाच्या  पथकाच्या संयुक्त कारवाईस यश 

ठळक मुद्देआष्टी तालुक्यातील सावरगांव परिसरातील सटवाईच्या डोंगरात बिबट्या जेरबंद

- नितीन कांबळे 

कडा  :  नगर जिल्ह्यातील  मढी, केळवंडी, करडवाडी या ठिकाणी तीन बालकांचा फडशा पडल्यानंतर आष्टी तालुक्यात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्यास वन विभागाने अखेर जेरबंद केले आहे. बुधवारी मध्यरात्री आष्टी तालुक्यातील सावरगांव परिसरातील सटवाईच्या डोंगरात भक्ष्यासाठी बाहेर पडलेला बिबट्या वन विभागाने लावलेल्या एका पिंजऱ्यात अडकला. 

नरभक्षक बिबट्याचा आष्टी तालुक्यात संचार झाल्याने येथील नागरिकांमध्ये दहशत पसरली होती. यानंतर वनविभागाने विविध ठिकाणी पिंजरे लावून बिबट्यास जेरबंद करण्याची तयारी सुरु केली होती. यासाठी औरंगाबाद, नगर, नाशिक, जळगाव, आष्टी येथील वनविभागाचे कर्मचारी आठ दिवसांपासून डोळ्यात तेल घालून सापळ्यावर लक्ष ठेऊन होते. बुधवारी मध्यरात्री हा बिबट्या भक्ष्याच्या शोधात बाहेर पडला. गर्भागिरी डोंगरपट्यातील सटवाईच्या डोगराकडे निघालेला बिबट्या वन विभागाने लावलेल्या एका पिंजऱ्यात अडकला.

नरभक्षक बिबट्या जेरबंद झाल्याचे कळताच परिसरातील नागरिकांनी एकच गर्दी केली. दहशत पसरवणारा बिबट्या पकडण्यात आल्याने दिलासा मिळाला असल्याचे सावरगांवचे सरपंच राजेंद्र म्हस्के सांगितले. तर नागरिकांनी नेहमी सतर्क राहण्याचे आवाहन आष्टी वनपरिक्षेत्र अधिकारी श्याम शिरसाठ यांनी केले. दरम्यान, बिबट्यास वैद्यकीय तपासणीसाठी नगरकडे नेण्यात आले असून त्यानंतर त्यास निवारण केद्रात दाखल करण्यात येईल अशी माहिती अहमदनगरचे साहायक वनरक्षक एस. एफ. सोनवणे यांनी दिली आहे. 

टॅग्स :leopardबिबट्याBeedबीडforestजंगल