शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

जातीयवाद्यांवर ‘एसआयडी’ची नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2019 00:18 IST

निवडणूक काळात स्वत:च्या फायद्यासाठी राजकारण करून जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांवर राज्य गुप्त वार्ता (एसआयडी) नजर ठेवून आहे. विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनूसार जिल्ह्यात परळी व आष्टी हे दोन तालुके सध्या आघाडीवर आहेत. अधिकारी, कर्मचाऱ्यांमार्फत अचानक भेटी देऊन गुप्त आढावा घेतला जात आहे.

ठळक मुद्देगुप्त आढावा : परळी, आष्टी तालुका आघाडीवर; अपर पोलीस महासंचालकांना गोपनीय अहवाल पाठविल्याची माहिती

बीड : निवडणूक काळात स्वत:च्या फायद्यासाठी राजकारण करून जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांवर राज्य गुप्त वार्ता (एसआयडी) नजर ठेवून आहे. विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनूसार जिल्ह्यात परळी व आष्टी हे दोन तालुके सध्या आघाडीवर आहेत. अधिकारी, कर्मचाऱ्यांमार्फत अचानक भेटी देऊन गुप्त आढावा घेतला जात आहे.बीड जिल्ह्यातील राजकारण नेहमीच राज्याचा विषय बनते. येथील एक घटना राष्ट्रीय स्तरावरची चर्चा होते. त्यातच सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे जोरात वाहत आहे. याच अनुषंगाने यंत्रणा कामाला लागली आहे. निवडणूक शांततेत पार पडण्यासाठी त्यांचे सर्वस्तरातून प्रयत्न सुरू आहेत. प्रशासनातील सर्वच विभाग आपली जबाबदारी चोखपणे पार पाडण्याचा प्रयत्न करीत आहेत. याच निवडणुकीच्या अनुषंगाने आता राज्य गुप्त वार्ताही सक्रीय झाली आहे. जिल्ह्यात कोठे काय घडते, कोण कारणीभूत आहे, कारण काय, याची माहिती त्यांच्याकडून घेत आहेत.दरम्यान, परळी व आष्टी तालुक्यात सार्वाधिक जातीय तेढ निर्माण केला जात असल्याचा एसआयडीचा अहवाल आहे. या तालुक्यांवर अधिकारी, कर्मचाऱ्यांची जास्त नजर आहे. त्यापाठोपाठ गेवराई आणि केजचा क्रमांक लागतो. माजलगाव सुद्धा एसआयडीच्या लिस्टवर आहे. इतर तालुक्यांमध्ये मात्र शांतता असल्याचे सांगण्यात येत आहे.परळी, धर्माळा प्रकरणाचा अहवाल वरिष्ठांकडेनुकतेच परळीतील खून प्रकरण व केज तालुक्यातील धर्माळा हल्ला प्रकरण चर्चेला आले. काहींनी सोशल मिडीयावर पोस्ट टाकल्यामुळे त्याच्या खाली जातीय तेढ निर्माण करणाºया कॉमेंट्स आल्या. या सर्वांवर एसआयडीने नजर ठेवून माहिती काढली आहे. हे कोणामुळे झाले, पोस्ट कोणी टाकली, त्याखाली कॉमेंट्स कोणी केल्या, याची सर्व माहिती एसआयडीने हस्तगत केल्याचे सूत्रांकडून समजते. या सर्व घटनेचे आढावा घेऊन गोपनिय अहवाल अपर पोलीस महासंचालकांना पाठविल्याचेही सूत्रांकडून सांगण्यात आले.‘त्या’ नेत्यांच्या हालचालींवर लक्षपोलिसांनी कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी शेकडो आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाया केल्या. यामध्ये बहुतांश लोक हे राजकीय आहेत. एसआयडीने कारवाया केल्या नसल्या तरी निवडणुक काळात उपद्रव करणाºया १२ नेत्यांची यादीच तयार केली आहे. त्यांच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवण्यासाठी पथके कार्यरत आहेत. १२ मध्ये सर्वच राजकीय पक्षांचे पदाधिकारी असून ६ लोकप्रतिनिधीही असल्याचे विश्वसनिय सूत्रांकडून समजते. या सर्वांचा रोजची रोज अहवाल वरिष्ठांकडे जात आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकbeed-pcबीडPoliceपोलिस