शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

धारूर तालुक्यात 'मुन्नाभाई एमबीबीएस'चे दुकान बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 18:49 IST

आरोग्य पथकाच्या कारवाईत धारूर ठाण्यात बोगस डॉक्टरवर गुन्हा दाखल

बीड : कुठलाही परवाना नसताना राजरोसपणे वैद्यकीय सेवा देणाऱ्या मुन्नाभाईचा पर्दाफाश करण्यात आले आहे. धारूरच्या तालुका आरोग्य पथकाने गुरूवारी धारूर तालुक्यातील जहागिरमोहा येथे ही कारवाई केली. संबंधीत बोगस डॉक्टरवर धारूर ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, बोगस डॉक्टरने घटनास्थळावरून पलायन केले.

मोनोतोसे रॉय (रा.जहागिरमोहा ता.धारूर) असे गुन्हा दाखल झालेल्या मुन्नाभाईचे नाव आहे. सूत्रांच्या माहितीनुसार रॉय हा मागील सहा महिन्यांपासून जहागिरमोहा येथे वास्तव्यास आहे. येथेच एका खोलीत त्याने दवाखाना सुरू केला होता. रॉयकडे वैद्यकीय सेवा देण्याचा देण्याचा कसलाही परवाना नव्हता. तरीही तो राजरोसपणे गावात उपचार करून नागरिकांची आर्थिक लुट करत असे. 

याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राधाकृष्ण पवार यांच्याकडे एक तक्रार प्राप्त झाली. त्यांनी तात्काळ धारूर तालुका आरोग्य अधिकारी डॉ.एस.डी.शेकडे यांना आदेश देऊन पथक नियूक्त केले. या पथकात नायब तहसीलदार एन.टी.विटेकर, सहा.फौजदार आर.एल.राठोड, पोना वडमारे, आरोग्य विस्तार अधिकारी एन.एच.पटेकर, आरोग्य सहायक एस.डब्ल्यू मांडवे आदींचा समावेश होता. डीएचओ डॉ.पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

गुरूवारी सकाळी साडेदहा वाजता हे पथक गावात धडकले. सेवा देत असलेल्या खोलीत जावून तपासणी करीत असतानाच काही ग्रामस्थ तिथे आले. त्यांनी पथकाला अडविण्याचा प्रयत्न केला. पथकाने समजुत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र ग्रामस्थ जास्तच आक्रमक झाले. पथकाला खोलीतून बाहेर काढले. पथकाने हा विरोध झुगारून खोलीतील सर्व साहित्य जप्त केले. त्यानंतर धारूर ठाणे गाठून फिर्याद दिली. भोगलवाडी प्रा.आ.केंद्राचे वैद्यकीय अधिकारी गणेश मुंडे यांच्या फिर्यादीवरून रॉय विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

ग्रामस्थांचा विरोध; महिला आघाडीवरपथक डॉक्टरवर कारवाई करत असताना ग्रामस्थांनी त्यांना विरोध केला. अनेकांनी पथकाच्या हातातील कागदपत्रे हिसकावून घेतले. विशेष म्हणजे पोलीस बंदोबस्तही यावेळी होता. मात्र महिला आघाडीवर असल्याने पथकाला माघार घ्यावी लागली. विशेष म्हणजे पथक आणि ग्रामस्थांचे बोलणे सुरू असतानाच रॉयने दवाखान्यातून पळ काढला. 

ग्रामस्थांकडून पुरावे नष्टपथकाने रॉयच्या दवाखान्यातून काही कागदपत्रे जप्त करून मोबाईलमध्ये फोटो व व्हिडीओ घेतले होते. याचवेळी काही ग्रामस्थांनी पथकावर धावून येत त्यांच्या हातातील मोबाईल हिसकावून घेतले. तसेच कागदपत्रे फाडण्याबरोबरच मोबाईलमध्ये डाटा उडविला. त्यामुळे पुरावे नष्ट झाले. ग्रामस्थांपुढे पथकाला शरनागती पत्कारून परतावे लागले.

आंबेवडगावातील डॉक्टर भितीने फरारजहागिरमोहा येथील कारवाई झाल्यानंतर पथक आंबेवडगाव येथे पोहचले. मात्र पथक येणार असल्याची माहिती या डॉक्टरला आगोदरच समजली असावी, म्हणून तो घर बंद करून पसार झाला होता. पथक त्याच्या घराला नोटीस चिटकवून परतले. दरम्यान, पाच वर्षापूर्वी याच गावात डॉ.विश्वास नामक मुन्नाभाईवर गुन्हा दाखल झाला होता. आम्ही योग्य ती कारवाई केली 

जहागिरमोहा येथील तक्रार येताच पथकाने पाहणी केली. यामध्ये कसलीही परवानगी नसताना वैद्यकीय सेवा पुरविली जात असल्याचे निदर्शनास आल्याने एकावर गुन्हा दाखल केला आहे. कारवाई दरम्यान ग्रामस्थांनी अडथळे आणले. मात्र जमाव मोठा असल्याने आम्हाला काही करता आले नाही. तरीही आम्ही योग्य ती कारवाई केलेली आहे.- डॉ.एस.डी.शेकडे, तालुका आरोग्य अधिकारी, धारूर

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीdoctorडॉक्टरBeedबीड