अंबाजोगाई - लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर अंबाजोगाईच्या बसस्थानकात शुकशुकाट दिसून येत आहे. एरवी सतत माणसांमुळे गजबजलेल्या बसस्थानकात अचानकच निर्मनुष्यता व शुकशुकाट जाणवू लागला आहे.
बीड जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २६ मार्च ते ४ एप्रिल या कालावधीत लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. दोन दिवसांपासून सकाळी ७ ते दुपारी १ वाजेपर्यंत व्यापार व जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी वेळ देण्यात आला आहे. मात्र, लॉकडाऊनच्या कालावधीत बससेवा बंद ठेवण्यात आली आहे. बससेवा बंद असल्याचा मोठा फटका सामान्य नागरिकांना बसू लागला आहे. ग्रामीण भागातील नागिरकांना रुग्णालयात येण्यासाठीही वाहन उपलब्ध नाही. खाजगी वाहनांनाही बंदी घालण्यात आली आहे. हक्काचे वाहन असलेली बस वाहतूकही बंद झाल्याने बसस्थानकात शुकशुकाट जाणवू लागला आहे.