शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

श्रीगोंदेकरांची ऑलिम्पिकवीराच्या आई-वडील, शिक्षकास सलामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2021 04:12 IST

अविनाश कदम/ लोकमत न्यूज नेटवर्क आष्टी : श्रीगोंदा येथील ‘अग्निपंख’ फाउंडेशनने शनिवारी श्रीगोंदा ते मांडवा (ता. आष्टी) ८० किलोमीटर ...

अविनाश कदम/

लोकमत न्यूज नेटवर्क

आष्टी : श्रीगोंदा येथील ‘अग्निपंख’ फाउंडेशनने शनिवारी श्रीगोंदा ते मांडवा (ता. आष्टी) ८० किलोमीटर प्रेरणा सायकल वारी काढून मांडवा येथील ऑलिम्पिक खेळाडू अविनाश साबळे यांच्या आई, वडिलांना सलाम केला. यावेळी अविनाशच्या आई, वडील व शिक्षक जमीर सय्यद यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू तरारले.

मांडवा येथील अविनाश साबळे हा वीटभट्टीवर काम करणाऱ्या मांडवा येथील एका मजुराचा मुलगा आहे. अविनाश साबळे याने टोकियोत सुरू असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत ३००० ट्रिपल चेसमध्ये नॅशनल रेकॉर्ड केले. या खेळात पुरुष गटात अविनाशच्या रूपाने भारताला ऑलिम्पिकमध्ये उतरण्याची संधी मिळाली हे विशेष आहे.

सायकलवारीस श्रीगोंद्यात राष्ट्रीय मल्ल भाग्यश्री फंड, सोनाली मंडलिक, धनश्री फंड, पल्लवी पोटफोडे, सिध्दी शिंदे, साक्षी इंगळे यांनी प्रस्थान झेंडा दाखविला. सायकल वारीचे श्रीगोंदा येथे नगरसेवक संग्राम घोडके, आढळगाव येथे सरपंच शिवप्रसाद उबाळे, शरद जमदाडे, रुईगव्हाण फाट्यावर जामदार सर, चांदे येथे सुद्रिक महाराज, मिरजगाव ग्रामस्थांनी स्वागत केले. तर आष्टी येथे पोलीस उपाधीक्षक विजय लगारे, ॲड. विजय ढोबळे यांनी भोजनाची व्यवस्था केली. कडा येथे ए. के. शिंदे यांनी स्वागत केले. अग्निपंखच्या वतीने अविनाशचे आईवडील वैशाली व मुकुंद साबळे, शिक्षक जमीर सय्यद यांचा सत्कार केला. मांडवेचे सरपंच अशोक मुटकुळे यांनी आभार मानले.

.....

शाळेत जातानाही अविनाश धावत होता

अविनाश लहानपणी शाळेत जाण्यासाठी धावत होता. त्याला खाण्यास सकस अन्न नव्हते, पण जिद्द होती. तो भारतीय सैन्य दलात शिपाई म्हणून भरती झाला आणि टोकियो ऑलिम्पिकमध्ये धावला. याचा खूप अभिमान वाटला.

-वैशाली व मुकुंद साबळे, आई, वडील.

...

सहभागी सायकलपटू

श्रावणी जगताप, ऋतुपर्ण साळवे, रोहीत वऱ्हाडे, कृष्णा साळवे, वेदांत दरेकर, वेदांत दरेकर, आदित्य वाजे, श्रीराम जगताप हे बालवीर तसेच प्रतिभा गांधी, संगीता इंगळे, मनिषा काकडे, शहाजी खेतमाळीस, लालासाहेब काकडे, दत्ताजी जगताप, नवनाथ दरेकर, संपत इधाटे, मच्छिंद्र सुपेकर, तुषार शिंदे, श्रीयद लोड, महारुद्र तांबे, अमोल गव्हाणे, चंदन घोडके, अंकुश तुपे, अजय गाडेकर, अमोल साळवे, विजय पवार.

010821\01_2_bed_18_01082021_14.jpg~010821\01_2_bed_19_01082021_14.jpg

श्रीगोंदा येथील अग्नीपंख फौंडेशनने शनिवारी श्रीगोंदा ते मांडवा (ता आष्टी) ८० किलोमीटर प्रेरणा सायकल वारी काढून मांडवा येथील ऑलिम्पिक खेळाडू अविनाश साबळे यांच्या आई, वडिलांना सलाम केला.~श्रीगोंदा येथील अग्नीपंख फौंडेशनने शनिवारी श्रीगोंदा ते मांडवा (ता आष्टी) ८० किलोमीटर प्रेरणा सायकल वारी काढून मांडवा येथील ऑलिम्पिक खेळाडू अविनाश साबळे यांच्या आई, वडिलांना सलाम केला.