शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

जहागीर मोहा गावात ‘मुन्नाभाई’चे दुकान बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 23:57 IST

कुठलाही परवाना नसताना राजरोसपणे वैद्यकीय सेवा देणाऱ्या ‘मुन्नाभाई’चा पर्दाफाश करण्यात आले आहे. धारूरच्या तालुका आरोग्य पथकाने गुरूवारी धारूर तालुक्यातील जहागिरमोहा येथे ही कारवाई केली.

ठळक मुद्देआरोग्य पथकाची कारवाई : धारूर ठाण्यात बोगस डॉक्टरवर गुन्हा दाखल

बीड / धारुर : कुठलाही परवाना नसताना राजरोसपणे वैद्यकीय सेवा देणाऱ्या ‘मुन्नाभाई’चा पर्दाफाश करण्यात आले आहे. धारूरच्या तालुका आरोग्य पथकाने गुरूवारी धारूर तालुक्यातील जहागिरमोहा येथे ही कारवाई केली. संबंधित बोगस डॉक्टरवर धारूर ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, बोगस डॉक्टरने घटनास्थळावरून पलायन केले.मोनोतोसे रॉय (रा.जहागिरमोहा ता.धारूर) असे गुन्हा दाखल झालेल्या मुन्नाभाईचे नाव आहे. सूत्रांच्या माहितीनुसार रॉय हा मागील सहा महिन्यांपासून जहागीर मोहा येथे वास्तव्यास आहे. येथेच एका खोलीत त्याने दवाखाना सुरू केला होता. रॉयकडे वैद्यकीय सेवा देण्याचा देण्याचा कसलाही परवाना नव्हता. तरीही तो राजरोसपणे गावात उपचार करून नागरिकांची आर्थिक लूट करत असे.याबाबत एका व्यक्तीने जिल्हा अरोग्य अधिकारी डॉ.राधाकृष्ण पवार यांच्याकडे तक्रार केली. त्यांनी तात्काळ धारूर तालुका आरोग्य अधिकारी डॉ.एस.डी.शेकडे यांना आदेश देऊन पथक नियूक्त केले. या पथकात नायब तहसीलदार एन.टी.विटेकर, सहा.फौजदार आर.एल.राठोड, पोना वडमारे, आरोग्य विस्तार अधिकारी एन.एच.पटेकर, आरोग्य सहायक एस.डब्ल्यू मांडवे आदींचा समावेश होता. डीएचओ डॉ.पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.गुरूवारी सकाळी साडेदहा वाजता हे पथक गावात धडकले. सेवा देत असलेल्या खोलीत तपासणी करीत असतानाच काही ग्रामस्थ तिथे आले. त्यांनी पथकाला अडविण्याचा प्रयत्न केला. पथकाने समजुत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र ग्रामस्थ जास्तच आक्रमक झाले. पथकाला खोलीतून बाहेर काढले. पथकाने हा विरोध झुगारून खोलीतील सर्व साहित्य जप्त केले. त्यानंतर धारूर ठाणे गाठून फिर्याद दिली. भोगलवाडी प्रा.आ.केंद्राचे वैद्यकीय अधिकारी गणेश मुंडे यांच्या फिर्यादीवरून रॉय विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आंबेवडगावातील डॉक्टर भीतीने फरारजहागीर मोहा येथील कारवाई झाल्यानंतर पथक आंबेवडगाव येथे पोहोचले. मात्र पथक येणार असल्याची माहिती या डॉक्टरला अगोदरच समजली असावी, म्हणून तो घर बंद करून पसार झाला होता. पथक त्याच्या घराला नोटीस चिटकवून परतले. दरम्यान, पाच वर्षापूर्वी याच गावात डॉ.विश्वास नामक मुन्नाभाईवर गुन्हा दाखल झाला होता.

टॅग्स :Beedबीडhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टरCrime Newsगुन्हेगारी