शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

पैशाच्या देवाणघेवाणीच्या वादातून पाटोद्यात गोळीबार; २५ जणांविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 19:56 IST

नळ योजनेतील कामाच्या पैशावरून कंत्राटदार विश्वनाथ हुले व माजी आमदार लक्ष्मण जाधव यांचे पुत्र संतोष जाधव यांच्यात अनेक दिवसापासून मतभेद होते.

ठळक मुद्देआरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी

पाटोदा (जि. बीड): नळपाणी योजनेच्या कामांमधील पैशाच्या देवणाघेवाणीवरून दोन गटात झालेल्या वादातून गोळीबार झाल्याची घटना पाटोदा शहरात बुधवारी रात्री उशिरा घडली. याप्रकरणी २९ एप्रिल रोजी पोलीस ठाण्यात २५ जणांविरुद्ध गन्हा दाखल केला असून त्यांना अटक केली आहे. दरम्यान, न्यायालयाने या आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.

नळ योजनेतील कामाच्या पैशावरून कंत्राटदार विश्वनाथ हुले व माजी आमदार लक्ष्मण जाधव यांचे पुत्र संतोष जाधव यांच्यात अनेक दिवसापासून मतभेद होते. बुधवारी दुपारी संतोष जाधव हे नळ योजनेतील कामाच्या पैशासाठी हुले यांच्याकडे शहरातील शिवाजी चौकात असलेल्या त्यांच्या घरी गेले. यावेळी दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर संतोष जाधव यांनी त्यांच्या काही सहकाऱ्यांसह रात्री उशीरा हुले यांच्या घरी धाव घेतली. दरम्यान, आपल्याला धोका असल्याचे जाणवल्याने कंत्राटदार विश्वनाथ हुुले यांनी त्यांच्या पिस्टलमधून दोन राऊंड फायर केले. या गोळीबारानंतर सर्वांनी तेथून पळ काढला. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी हुले यांच्या घरी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला. यावेळी उपाधीक्षक विजय लगारे यांनी देखील घटनास्थळी जाऊन पाहणी केली.

याप्रकरणी २९ एप्रिल रोजी गोपनीय विभागाचे पोलीस नाईक कातखडे यांच्या फिर्यादीवरून पाटोदा पोलीस ठाण्यात विश्वनाथ हुले, संतोष जाधव, शरद बामदले, सुधाकर गर्जे, गणेश खाडे, अमृत भोसले, मयूर जाधव, संदीप जाधव व अन्य २५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या सर्वांना पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक आंधळे, पोलीस हवाललदार तांदळे, पो. हे. भोसले, सानप यांनी केली.

दोन दिवसांची पोलीस कोठडीया घटनेनंतर कोणीच गुन्हा दाखल केला नाही. त्यामुळे पोलिसांनी सुमोटोअंतर्गत दोन्ही गटांतील व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गुरुवारी दोन्ही गटांतील आरोपींना न्यायालयात हजर केले. यावेळी दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस उपाधीक्षक विजय लगारे यांनी दिली.

हे आहे वादाचे कारणपाटोदा नगरपंचायत होण्यापूर्वी ग्रामपंचायत होती. त्यावेळी ३ कोटी ७० लाख रुपयांची पेयजल योजना मंजूर करण्यात आली होती. तेव्हा संतोष जाधव हे सरपंच होते. तत्कालीन नियमानुसार ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा समितीच्या देखरेखीखाली योजनेचे काम केले होते. योजनेचे कंत्राट हे विश्वनाथ हुले यांना मिळाले होते. संतोष जाधव हे सरपंच असल्यामुळे या योजनेचे अध्यक्ष होते. या कामाच्या आर्थिक व्यवहारातून दोघांमध्ये मतभेद झाले. पाटोदा येथे केलेल्या या योजनेच्या कामाची तक्रार करण्यात आली. यासंबंधीचा खटला उच्च न्यायालयात सुरू आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीड