शहरं
Join us  
Trending Stories
1
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
2
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
3
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
4
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
6
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
7
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
8
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
9
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
10
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
11
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
12
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
13
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
14
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
15
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
16
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
17
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
18
लालू यादवांच्या मुलाची बिहार निवडणुकीसाठी अजब खेळी, अभिनेत्री दिशा पटानीशी कनेक्शन काय?
19
२५% ने बधला नाही, ट्रम्प भारताच्या वर्मावर घाव घालण्याच्या तयारीत; 'या' सेक्टरवर २५०% टॅरिफची धमकी
20
Khushbu Saroj : अभिमानास्पद! मित्रांनी वडिलांची उडवली खिल्ली, आईने केला सपोर्ट; लेक गाजवतेय फुटबॉलचं मैदान

धक्कादायक ! खाटांसाठी दुसऱ्याच्या मरणाची वाट; बीड जिल्हा रुग्णालयातील स्थिती 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2020 19:33 IST

प्रशासन, आरोग्य विभागाचे अपयश उघड झाल्याने सर्वत्र संताप

ठळक मुद्देरुग्ण, नातेवाईकांची उपचारासाठी धडपड350 खाटा जिल्हा रुग्णालयातील भरल्या20 खाटांची फिवर क्लिनीक ओपीडीही दोन तासाच भरली

- सोमनाथ खताळ 

बीड : कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने जिल्हा रुग्णालयातील खाटा संपल्या आहेत. आता एक खाट मिळविण्यासाठी दुसऱ्याच्या मरणाची वाट पहावी लागत आहे. रविवारी रात्री असाच प्रकार निदर्शनास आला. आरोग्य विभाग व जिल्हा प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे आता सामान्य नागरिकांचे हाल होत आहेत. एका खाटासाठी आता रुग्ण व नातेवाईकांना धडपड करावी लागत आहे. 

जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालयातील ३५० खाटा पूर्णपणे भरल्या आहेत. २० खाटांची रविवारी दुपारी सुरू केलेली फिवर क्लिनीक ओपीडीही अवघ्या दोन तासात हाऊसफुल्ल झाली. त्यामुळे रात्री सहा वाजेच्या सुरारास एका खाटासाठी संशयित रुग्णांची गर्दी जमली होती. याच दरम्यान, एका व्यक्तीचा मृत्यू झाला. त्याचा मृतदेह बाहेर काढल्यानंतर दुसऱ्या संशयिताला तो खाट देण्यात आला. इतर रुग्णांना मात्र, खाट मिळविण्यासाठी रात्रभर धडपड करावी लागली.

आरोग्य विभाग व जिल्हा प्रशासनाला वारंवार संपर्क करून खाटा उपलब्ध करून देण्यासाठी विनंती केली जात होती. परंतु खाटाच नाहीत तर आम्ही काय करणार? असे उत्तर प्रशासनाकडून देण्यात येत होते. त्यामुळे येथील संशयित रुग्ण खाट मिळविण्यासाठी दुसऱ्याच्या मरणाची वाट पहात असल्याचे दिसले. जिल्हा प्रशासनाच्य ढिसाळ नियोजनामुळे ही गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. वाढती रुग्णसंख्या पाहून प्रशासनाने खाटांची व्यवस्था करण्याची गरज होती. तसे झाले असते तर रुग्णांना वाट पाहण्याची वेळ आली नसती, अशी चर्चा रुग्णालय परिसरात होती.

रुग्णाला त्रास होत असतानाही खाटा मिळत नसल्याने रुग्ण व नातेवाईक उपस्थित डॉक्टर, परिचारीकांसोबत वाद घालत आहेत.­ त्यांच्यावर रोष व्यक्त होताना दिसत आहे. आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी व जिल्हा प्रशासनातील अधिकारी मात्र, याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसते. वाढती रुग्णसंख्या पाहता आगोदरच नियोजन केले असते तर वादाचे प्रकार उद्भवले नसते, अशी चर्चा केली जात आहे.

खाजगीत उपचार करण्यास नकारताप, सर्दी, खोकला असे आजार असणाऱ्या रुग्णांना खाजगी रुग्णालयात उपचार करण्यास नकार दिला जात आहे. तर स्थलांतरीत जिल्हा रुग्णालयात गेल्यावर कोवीड रुग्णालयात पाठविले जाते. परंतु येथे खाटा नसल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. संशयितांवर उपचार करण्यासह त्यांना खाटा पुरविण्यासंदर्भात तात्काळ उपाययोजना करण्याची गरज आहे.

रुग्णसंख्या वाढत असल्याने खाटा कमी पडत आहेत. त्या उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. खाजगी रुग्णालये अधिगृहीत केली जात आहेत. रुग्णांचे हाल होणार नाहीत, यासाठी प्रयत्न सुरूच आहेत.- डॉ.अशोक थोरात, जिल्हा शल्य चिकित्सक, बीड

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसBeedबीड