शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स प्ले ऑफमध्ये! मुंबई इंडियन्सने हातचा सामना गमावला 
2
जरांगेंसोबतच्या भेटीत काय घडलं?; बीडमधील सांगता सभेत शरद पवारांनी प्रथमच सविस्तरपणे सांगितलं!
3
राज्यातील 11 जागांवरील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, पंकजा मुंडेंसह या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
4
भाजपने पवारांचं घर फोडलं?; फडणवीसांनी सांगितलं अजितदादांच्या बंडामागचं 'लॉजिक'
5
कोलकाताने १६ षटकांत मुंबईसमोर आव्हान उभे केले; बुमराहच्या यॉर्करने सर्वांना चकित केले
6
औरंगाबादमध्ये प्रचारात जोरच दिसला नाही! आता मतदारांना घराबाहेर काढण्याचं आव्हाण; कोण होणार यशस्वी? 
7
कुवेतमध्ये राजकीय भूकंप! अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त, घटनेच्या काही कलमांनाही स्थगिती 
8
Amit Shah : "मोदी देशाचं नेतृत्व करत राहतील यात कन्फ्यूजन नाही"; अमित शाह यांचा केजरीवालांवर पलटवार
9
मुंबई इंडियन्स-कोलकाता नाईट रायडर्स सामना रद्द होण्याची शक्यता! महत्त्वाचे अपडेट्स 
10
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   
11
करीना कपूर अडकली कायद्याच्या कचाट्यात, प्रेग्नंसीसंदर्भातील पुस्तकावर 'बायबल'चा उल्लेख
12
Jay Shah यांचा मोठा निर्णय! आता सामन्याआधी टॉस नाही होणार, पाहुणा संघ निर्णय घेणार 
13
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले
14
धोनीला नक्की काय झालं? सामना संपल्यानंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी न आल्याने रंगली चर्चा
15
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 
16
२७ वर्षांनंतर सिनेइंडस्ट्रीला रामराम करून अध्यात्माकडे वळली अभिनेत्री, बनली साध्वी
17
एक-एक गोष्टी बदलत आहेत, हे मंदिर मी उभं केलंय...; Rohit Sharma चा व्हिडीओ KKRकडून डिलीट
18
'भाजप पुन्हा जिंकला तर उद्धव ठाकरे तुरुंगात जातील'; केजरीवालांचा गंभीर आरोप
19
Patel Engineering Ltd: वर्षभरात पैसे दुप्पट, ३ वर्षांपासून शेअर देतोय जबरदस्त रिटर्न; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...
20
EPFO: तुमचा मोबाइल नंबर बदलला असेल तर घरबसल्या कसा कराल अपडेट? पाहा प्रोसेस

धक्कादायक ! एक दिवसांपूर्वी रुजू झालेल्या बस चालकाचा आज आगारात आत्महत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2021 12:25 PM

आज साप्ताहिक सुटी असतानाही कामावर बोलवले होते

परळी ( बीड ): बुधवारी रुजू होऊन परळी-बीड बस सेवा देणारे एसटी चालक नागनाथ गित्ते ( ४६, मुळ गाव बेलबां ता. परळी) यांनी आज सकाळी ६ वाजेच्या दरम्यान परळी बस स्थानकात विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांच्याकडे सापडलेल्या एका चिठ्ठीत प्रशासनाचे धोरण आणि अधिकाऱ्यांच्या वागणुकीमुळे आत्महत्या करत असल्याचा उल्लेख आहे. 

राज्य शासनात एसटी महामंडळ विलीन करावे या मागणीसाठी कर्मचाऱ्यांचे सध्या आंदोलन सुरु आहे. दरम्यान, शासनाने दिलेली पगार वाढ आणि सवलती स्वीकारून काही कर्मचारी पुन्हा कामावर रुजू होत आहेत. परळी आगारातील नागनाथ गित्ते हे चालक देखील बुधवारी रुजू झाले. त्यांनी बुधवारी परळी-बीड अशी बसफेरी करत सेवा दिली. 

आज त्यांची साप्ताहिक सुटी होती. मात्र, आगारातील अधिकाऱ्याने त्यांना कामावर बोलावले. यामुळे गित्ते सकाळी ६ वाजता आगारात आले मात्र प्रवेश द्वारावरच त्यांनी विषारी द्रव्य प्राशन केले. त्यांना लागलीच अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या गित्ते यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. 

जवळ सापडली नोट नागनाथ गित्ते यांच्याजवळ एक चिट्ठी सापडली आहे. यात त्यांनी, ''मी नागनाथ गित्ते, चालक परळी वै, मी प्रशासनाचे धोरण आणि अधिकारी वर्ग यांच्या कारवाईला कंटाळून आत्महत्या करीत आहे.'' असा उल्लेख केला आहे. साप्ताहिक सुट्टी असतानाही दबाव टाकून कामावर बोलावल्याने गित्ते यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला असा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. या घटनेमुळे एसटी अधिकाऱ्यांचा विरोधात कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी परळी पोलिस ठाण्यात धाव घेतली आहे. 

टॅग्स :ST Strikeएसटी संपBeedबीडCrime Newsगुन्हेगारी