शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक ! कोरोना बळींच्या यादीमध्ये जिवंत व्यक्तींची नावे, शासकीय मदतीसाठीच्या यादीतून उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2021 17:32 IST

मृतांच्या यादीत ५३२ नावे; २१६ नावे आली कशी?

- अविनाश मुडेगावकरअंबाजोगाई (जि. बीड) : आरोग्य खात्याच्या नोंदीनुसार अंबाजोगाई तालुक्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ३१६ असताना शासकीय मदतीसाठी देण्यात येणाऱ्या यादीत मात्री ५३२ नावे समाविष्ट केली आहेत. अधिक माहिती घेता मृतांच्या यादीत चक्क जिवंत असलेल्या व्यक्तींचा समावेश केल्याचे आढळून आले असून प्रशासनाचा सावळागोंधळ पुन्हा समोर आला आहे.

कोरोनाच्या प्रादुर्भावाने मृत्यू झालेल्या व्यक्तींना शासनातर्फे ५० हजार रुपयांची मदत देण्याचा निर्णय झाला आहे. या अनुषंगाने महसूल व स्थानिक प्रशासनाकडून यादी केली जात आहे. अंबाजोगाई शहरातील मृतांची यादी तहसीलदार विपिन पाटील यांनी अंबाजोगाई नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे पाठविली. नगर परिषदेच्या वतीने या यादीची पडताळणी करताना शहरात जिवंत असणाऱ्या व्यक्तींचाही मृत म्हणून समावेश झाल्याचे उघड झाले. नगर परिषदेचे कर्मचारी आज सामाजिक कार्यकर्ते नागनाथ वारद यांच्या कुटुंबाकडे खातरजमा करण्यासाठी गेले. यावेळी आपले नाव मृतांच्या यादीत समाविष्ट असल्याचे पाहून खुद्द नागनाथ यांना धक्काच बसला. असाच प्रकार त्याच परिसरात राहणाऱ्या दुसऱ्या कुटुंबाच्या बाबतीत घडला. जिवंत व्यक्तींची नावे मृतांच्या यादीत समाविष्टच झालीच कशी, असा प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाला आहे.

मृत ३१६ तर यादीत ५३२ नावेअंबाजोगाई तालुक्यात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आतापर्यंत ३१६ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आरोग्य विभागाकडे आहे. मात्र, मृतांच्या यादीत ५३२ नावांचा समावेश आहे. ही उर्वरित २१६ नावे आली कुठून, याचा शोध आता प्रशासकीय यंत्रणेला घ्यावा लागणार आहे. या यादीत आणखी किती जिवंत व्यक्तींचा समावेश झाला आहे, त्याचीही पडताळणी करावी लागणार आहे.

खात्री करूनच होईल यादी प्रसिद्धकोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींची यादी तयार करण्याचे काम सध्या सुरू आहे. या यादीची खात्री करण्यासाठी स्थानिक पातळीवर नगर परिषद व ग्रामपंचायतींना शहानिशा करण्याचे आदेश दिले आहेत. यादीतील त्रुटी व चुका दुरुस्त करूनच यादी तयार केली जाईल.- विपिन पाटील, तहसीलदार, अंबाजोगाई

टॅग्स :Deathमृत्यूBeedबीडcorona virusकोरोना वायरस बातम्या