शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक ! कोविड सेंटरमध्ये दारूच्या नशेत कर्मचाऱ्याचा गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2020 17:30 IST

नशेतील या कर्मचाऱ्यास लोखंडी सावरगाव येथील कोविड रुग्णालयात हलविण्यात आले.

ठळक मुद्देकेजमधील कोविड केअर सेंटरमधील प्रकार उपचार घेणाऱ्या महिलांमध्ये भीती

केज : येथील कोविड सेंटरमध्ये  उपचारासाठी  दाखल झालेल्या पशुसंवर्धन विभागातील परिचर पदावर कार्यरत कर्मचाऱ्याने बुधवारी रात्री दारू पिऊन कोविड सेंटरमध्ये धिंगाणा घातला. त्यानंतर नशेतील या कर्मचाऱ्यास लोखंडी सावरगाव येथील कोविड रुग्णालयात हलविण्यात आले. ही माहिती केज उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय राऊत यांनी ‘लोकमत’ला दिली. 

तालुक्यातील पशुसंवर्धन विभागात परिचर असलेल्या कर्मचाऱ्यास कोरोनाची लागण झाल्याने त्यास पाच- सहा दिवसांपूर्वी पिसेगाव  येथील कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल केले होते. दीपावलीचा सण असल्याने  घरचा जेवणाचा डबा दिला जात असल्याने कोविड सेंटरमधील अधिकाऱ्यांनी आक्षेप घेतला नाही. मात्र, सदर कर्मचाऱ्यास बुधवारी  सायंकाळी जेवणाचा डबा देताना सोबत  दारूही देण्यात आल्याचे सांगण्यात आले. आलेली दारू प्राशन केल्याने नशा चढलेल्या कर्मचाऱ्याने  कोविड सेंटरमध्ये धिंगाणा घातला.  या कृत्याने सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्या अन्य महिलांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. असा प्रकार होऊ नये अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

दारू कोणी पुरविली ? प्रश्न अनुत्तरितरुग्णांनी वैद्यकीय अधिकाऱ्याकडे तक्रार करताच  या कर्मचाऱ्यास लोखंडी सावरगाव येथील कोविड रुग्णालयात हलविण्यात आले. तो कोरोनाबाधित असल्याने कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नसल्याचे सांगण्यात आले.  कोविड सेंटरमध्ये कोरोनावर उपचार घेणाऱ्या कर्मचाऱ्यास जेवणाच्या डब्यातून दारू कोणी पुरवली, हे मात्र अनुत्तरित आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBeedबीडCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस