शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक ! 'रापम'च्या विभागीय कार्यालयातच महिला कर्मचाऱ्याला अधिकाऱ्याकडून मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 16:35 IST

अविवाहित महिला कर्मचारी काम करत असताना तिला प्रभारी लेखापाल नारायण मुंडे यांनी वाईट हेतून स्पर्श केला.

ठळक मुद्देमहिलेची विभागीय नियंत्रकांकडे तक्रारपिडीतेची छेडछाड केल्याचाही आरोप

बीड : येथील राज्य परिवहन महामंडळाच्या विभागीय कार्यालयातील एका महिला कर्मचाऱ्याला अधिकाऱ्याने छेडछाड करीत कार्यालयातच मारहाण केल्याची घटना १४ ऑगस्ट रोजी घडली होती. घाबरलेल्या महिलेने बुधवारी याबाबत विभागीय नियंत्रकांकडे लेखी तक्रार केली आहे. या प्रकाराने एसटी महामंडळात खळबळ उडाली आहे. तर दुसऱ्या बाजूला महिलेच्या आरोपात तथ्य नसल्याचा दावा अधिकाऱ्याने केला आहे.

विभागीय कार्यालयात महिला कर्मचाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. यापूर्वीही साधारण दोन वर्षांपूर्वी एका अधिकाऱ्याने आपल्याच विभागातील महिला कर्मचाऱ्याची छेडछाड करत शरीर सुखाची मागणी केली होती. याची तक्रार केल्यानंतर दक्षता समितीने चौकशी केली. यात दोषी आढळल्याने संबंधित अधिकाऱ्यावर विनयभंगाचा गुन्हाही दाखल झाला होता. ही घटना विसरण्यापूर्वीच आता लेखा विभागात नवीन घटना घडली आहे. अविवाहित महिला कर्मचारी काम करत असताना तिला प्रभारी लेखापाल नारायण मुंडे यांनी वाईट हेतून स्पर्श केला. यावर ती रागावून वरिष्ठांकडे तक्रार देण्यास जाताना तिला पायऱ्यांवर अडवून मुंडे यांनी मारहाण केली. तसेच नौकरी घालविण्याची धमकी दिल्याचा उल्लेख तक्रारीत आहे. या प्रकाराने मात्र, बीड रापम कार्यालय पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

हेही वाचा - स्वप्नीलचे रुग्णसेवेचे स्वप्न अधुरे; नाशिकमध्ये संशयास्पद मृत्यूने कुटुंबाला जबर धक्का

डीसी म्हणतात, आणखी त्रास सहन कर - पीडिता५ ऑगस्ट रोजीही धमकावल्याचा प्रकार घडला होता. पीडित महिला कर्मचारी विभागीय नियंत्रक अजय मोरे यांच्याकडे तक्रार घेऊन गेली. यावर तिला डेपोत बदली करतो, नाहीतर आणखी त्रास सहन कर, असे उत्तर दिल्याचे पीडिता सांगते. या प्रकारावरून मोरे यांच्याकडूनही अधिकाऱ्याला अभय असल्याचा आरोप केला जात आहे.

सर्व आरोप खोटे माझ्या विभागात १० ते १२ महिला कर्मचारी आहेत. सर्वांना आई-बहिणीप्रमाणे सन्मान देतो. माझ्यावर केलेले आरोप सर्व खोटे असून त्यात काहीही तथ्य नाही. केवळ बदली पाहिजे म्हणून हे करण्यात आले आहे. याने माझीच मानसिकता खचली आहे.- नारायण मुंडे, लेखापाल रापम बीड

चौकशी केली जाईलमाझ्याकडे तक्रार आली आहे. बुधवारी रात्री उशिरा तक्रार आली असून गुरूवारी सुट्टी आहे. शुक्रवारी दोघांनाही समोर बोलवून चौकशी केली जाईल.- अजय मोरे, विभागीय नियंत्रक, बीड

टॅग्स :state transportएसटीsexual harassmentलैंगिक छळBeedबीडCrime Newsगुन्हेगारी