शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक ! ब्लॅकमेल करणाऱ्या महिलेचा खून करून मृतदेह शेतात पुरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 19:57 IST

पैसे नाही दिल्यास बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी महिला देत असे

ठळक मुद्देसततच्या धमक्यांमुळे संतापल्याने खुनाचा रचला कटभाऊजीकडून पैसे घेऊन देतो असे सांगून शिरढोणला नेले

अंबाजोगाई (बीड ) : बलात्काराची तक्रार देण्याची धमकी देऊन सातत्याने पैसे मागणाऱ्या अंबाजोगाई तालुक्यातील नांदगाव तांडा येथील एका महिलेचा खून करण्यात आला. यानंतर तिचा मृतदेह उस्मानाबाद जिल्ह्यातील शिराढोण येथे पुरल्याची चित्रपटास शोभेल अशी घटना उघडकीस आली आहे.

कविता कुंडलिक चव्हाण (वय २२, रा. नांदगाव तांडा, ता. अंबाजोगाई) असे त्या महिलेचे नाव आहे. तिच्या गावातील मोहन भीमराव राठोड याला ती सारखे पैसे मागत असे. पैसे नाही दिल्यास बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी तिने मोहनला दिली. सततच्या धमक्यांमुळे संतापलेल्या मोहनने पांडुरंग रावसाहेब पवार (रा. शिराढोन तांडा, ता. कळंब, जि. उस्मानाबाद) याच्या मदतीने कविताच्या खुनाचा कट रचला. 

मोहनने भाऊजीकडून १० हजार रूपये घेऊन देतो असे आश्वासन कविताला दिले. यानंतर १२ मे रोजी सायंकाळी ७ वाजता मोहन कविताला दुचाकीवरून (एमएच ४४ व्हि १५९४) उस्मानाबाद जिल्ह्यातील शिराढोणला घेऊन गेला. तिथे गोराज नावाच्या शेतात रात्री उशीरा मोहनने नायलाॅन दोरीच्या साह्याने गळा आवळून कविताचा खून केला. त्यानंतर मध्यरात्रीतून पांडुरंगच्या मदतीने तिचा मृतदेह पोत्यात घालून खड्ड्यात पुरला. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक संदिप यादव यांच्या फिर्यादीवरून मोहन राठोड आणि पांडुरंग पवार या दोघांवर बर्दापूर ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. पुढील तपास सहा. पोलीस निरिक्षक लक्ष्मण केंद्रे करत आहेत.

बेपत्ता झाल्याची नातेवाईकांची तक्रार कविता बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या नातेवाईकांनी १२ मे रोजी बर्दापूर ठाण्यात दिली होती. या प्रकरणाचा तपास करत असताना फौजदार यादव यांना त्यात काहीतरी काळेबेरे असल्याचा संशय आला. त्यांनी संतोषला ताब्यात घेऊन पोलीसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची इत्यंभूत माहिती दिली.

पोलीस पथक शिराढोणला रवाना :पोलीसांनी आरोपी मोहन राठोडला बेड्या ठोकल्या असून कविताचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी आणि दुसरा आरोपी पांडुरंगचा शोध घेण्यासाठी बर्दापूर पोलीसांचे पथक शिराढोणकडे रवाना झाले आहे. त्यानंतर या प्रकरणातील अनेक गोष्टींचा उलगडा होऊ शकणार आहे.

टॅग्स :MurderखूनCrime Newsगुन्हेगारीBeedबीडArrestअटक