शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

बीडमध्ये शिवशाही बसचे चालक-वाहक प्रवाशांच्या मारहाणीत गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2018 00:00 IST

प्रवासादरम्यान वाहकासोबत झालेल्या बाचाबाचीचा राग मनात ठेवून बस मधून उतरल्यानंतर वाहक- चालकास बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना रविवारी रात्री १२.३० वाजता बीड बसस्थानकात घडली. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून, जखमी वाहक-चालकावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : प्रवासादरम्यान वाहकासोबत झालेल्या बाचाबाचीचा राग मनात ठेवून बस मधून उतरल्यानंतर वाहक- चालकास बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना रविवारी रात्री १२.३० वाजता बीड बसस्थानकात घडली. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून, जखमी वाहक-चालकावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत.पुणे- बीड या शिवशाही बसचे वाहक ज्ञानेश्वर साळूंके, चालक हनुमान वाघमारे हे बस (एमएच ०६ बीडब्ल्यू १००३) घेऊन रविवारी रात्री बीडकडे येत होते. अहमदनगर येथून एक प्रवासी या बसमध्ये चढला. वाहकाने प्रवाशांना तिकीट घेण्याचे सांगितले होते. असे असतानाही सदरील प्रवाशाने तिकीट घेण्यास टाळाटाळ केली. मद्य प्राशन केलेल्या या प्रवाशाने बऱ्याच वेळानंतर तिकीट मागितले. यावेळी वाहक सोळुंके आणि त्याच्यात बाचाबाची झाली. या प्रवाशाने वाहक आणि चालकाला बीडमध्ये पोहचल्यावर माणसे बोलावून मारण्याची धमकी दिली.दरम्यान आष्टी येथे आल्यानंतर वाहतूक नियंत्रकांना याची माहिती देण्यात आली. यावेळी या प्रवाशाने आमचे मिटले असून, भांडण न करण्याचे अश्वासन दिले. रात्री १२ वाजेच्या दरम्यान शिवशाही बस बीड येथे पोहचली. सर्व प्रवासी उतरून गेल्यानंतर वाहक-चालक बस जमा करून घरी निघाले असता, त्या प्रवाशाने बोलाविलेल्या आठ ते दहा जणांनी या दोघांवर हल्ला केला. यावेळी चालक व वाहकास काठ्याने मारहाण केली.या मारहाणीत चालक व वाहक गंभीर जखमी झाले असून, चालक हनुमान वाघमारे यांचा हात फ्रॅक्चर झाला आहे. याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.कामगार सेनेचे विभागीय सचिव राहुल बहिर, आगारप्रमुख पवार स्थानक प्रमुख महाजन व विविध संघटना पदाधिकारी यांनी जखमींची भेट घेतली. या प्रकरणी आरोपीस तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. नसता तीव्र आंदोलनाचा इशारा एस. टी. कर्मचाºयांनी दिला.

 

टॅग्स :BeedबीडBus DriverबसचालकCrime Newsगुन्हेगारी