शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

शिवसेना, राष्टवादी कॉँग्रेसने मिळवली ‘हॅटट्रिक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 00:25 IST

विधानसभा निवडणुकांना काही महिने अवकाश असला तरी बीड विधानसभा मतदार संघात मात्र राजकीय वातावरण तापण्यास सुरूवात झाली आहे.

ठळक मुद्देबीड विधानसभा मतदार संघ : नऊ निवडणुकांत कॉँग्रेस, कॉँग्रेस एस, जनता पक्षाला मिळाला एकदा विजय

सतीश जोशी ।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : विधानसभा निवडणुकांना काही महिने अवकाश असला तरी बीड विधानसभा मतदार संघात मात्र राजकीय वातावरण तापण्यास सुरूवात झाली आहे. १९७८ पासून आतापर्यंत नऊ निवडणुका झाल्या. पैकी राष्टÑवादी काँग्रेस आणि शिवसेनेने तीन वेळा तर काँग्रेस, काँग्रेस (अर्स) आणि जनता पक्षाने प्रत्येकी एक वेळेस या मतदार संघात विजय संपादन केला आहे.बीड विधानसभा मतदार संघात एकूण ३ लाख ३० हजार ६१९ मतदार असून यापैकी १ लाख ७६ हजार ७१४ पुरुष, १ लाख ५३ हजार ९०० महिला तर ५ मतदार तृतीयपंथी आहेत. जवळपास सर्वच पक्षांना या मतदार संघाने विजयश्री देऊन नेतृत्त्व करण्याची संधी दिली आहे. राष्टÑवादी काँग्रेसचे जयदत्त क्षीरसागर आणि शिवसेनेचे प्रा. सुरेश नवले हे लागोपाठ दुसऱ्यांदा विजयी झाले. परंतु, १९९० मध्ये नवले यांनी अपक्ष उमेदवार माजी आ. राजेंद्र जगताप यांचा १४ हजार मतांनी तर १९९५ मध्ये त्यांनी जयदत्त क्षीरसागर यांचा २६ हजार ६९१ मतांनी पराभव केला होता. तिसऱ्यांदा म्हणजे १९९९ मध्ये ते अपक्ष म्हणून रिंगणात उतरले परंतु पराभूत झाले. जयदत्त क्षीरसागर यांनी २००९ मध्ये शिवसेनेचे सुनिल धांडे यांचा जवळपास ७५ हजार मतांनी तर २०१४ मध्ये जिल्ह्यात नरेंद्र मोदी लाट असतानाही भाजपाच्या तिकिटावर उभे टाकलेल्या शिवसंग्रामचे विनायक मेटे यांचा जवळपास सहा हजार मतांनी पराभव केला. आता ते शिवसेनेत येऊन मंत्री झाले आहेत.सर्वच पक्षांना आघाडी, युतीच्या माध्यमातून या मतदारसंघाने निवडून दिले परंतु, अपेक्षेप्रमाणे विकास झाला नाही. एकेकाळी येथील तेल उद्योग प्रगती पथावर होता, मोठी आर्थिक उलाढाल होत असे, थोड्याफार प्रमाणात रोजगार निर्माण होत असे परंतु, तो आता डबघाईला आला आहे. आजही बीड शहर प्राथमिक नागरी सुविधातच अडकले आहे. केवळ नगर पालिकेची यंत्रणा कुचकामी असल्यामुळे शहरवासियांना १५-१५ दिवस पाणी मिळत नाही. अमृत पेयजल योजनेचे अधिक गतीने पूर्ण होणे गरजेचे आहे. भूमीगत गटार योजना मंजूर झाली परंतु ती सुरू कधी होणार हा एक प्रश्न आहे. पाणी पुरवठा योजनेच्या कामामुळे शहरातील रस्ते फोडले आहेत. याचवेळी जर गटार योजनेचे काम हाती घेतले तर पुन्हा पुन्हा रस्त्याची फोडाफोडी होणार नाही.सामान्य रुग्णालयाच्या वाढीव खाटाच्या प्रस्तावास मंजुरी मिळाली आहे. हे कामदेखील लवकर पूर्ण झाले तर त्याचा रुग्णांना फायदा होईल. बीड बायपासमुळे अनेक गावांचा दळणवळणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. औद्योगिक विकास रखडला आहे. रेल्वेमार्गाचे काम पूर्ण न झाल्यामुळे नवीन प्रकल्प येणार नाहीत. हा प्रकल्प पूर्ण होणे गरजेचा आहे.

टॅग्स :BeedबीडPoliticsराजकारणShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस