जातेगाव : गेवराई तालुक्यातील जातेगाव येथे झालेल्या बैठकीत शिवजयंती उत्सवाची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. येथील ग्रामपंचायतीसमोर ही बैठक झाली. यावेळी कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी प्रदीप चव्हाण तर उपाध्यक्षपदी अण्णा चव्हाण व अजिम शेख यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. सचिवपदी रवी चव्हाण, सहसचिवपदी आदित्य सराटे, कोषाध्यक्षपदी गणेश पांढरे यांची निवड करण्यात आली. यावर्षी सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी भास्करराव चव्हाण, बाबुराव चव्हाण, कल्याण चव्हाण, गोपाल चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले. या बैठकीला ज्येष्ठ नेते बाबुराव भाऊ चव्हाण, भास्करराव जिजा चव्हाण ,संदिपान दादा चव्हाण, कृष्णा बापू चव्हाण , कल्याण वाघमारे, आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन आशिष कुलकर्णी यांनी केले.
जातेगावात शिवजयंती उत्सवाची कार्यकारिणी जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:36 IST