शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

शिरूरमधून शेवगावला चंदनाचा गाभा घेऊन जाणाऱ्या 'पुष्पा'ला बेड्या

By सोमनाथ खताळ | Updated: July 15, 2023 15:11 IST

एलसीबीची कारवाई : दुचाकीसह ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त

बीड : शिरूर तालुक्यातील फुलसांगवी शिवारात चंदनाची झाडे तोडून त्यातील गाभा शेवगावला घेऊन जाणाऱ्या 'पुष्पा'ला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. ही कारवाई गुरुवारी सायंकाळच्या सुमारास फुलसांगवीजवळील मावसकर वस्तीजवळ स्थानिक गुन्हे शाखेने केली.

राम आप्पासाहेब गायकवाड (वय ४५, रा. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर) असे पकडलेल्या आरोपीचे नाव आहे. गायकवाड हा शेतातील चंदनाची झाडे शोधत असे. शेतकरी काम करून घराच्या दिशेने निघताच तो झाड तोडून त्यातील गाभा घेऊन धूम ठोकत असे. हीच माहिती उपनिरीक्षक श्रीराम खटावकर यांना मिळाली. त्यांनी पथकासह गुरुवारी फुलसांगवी शिवारात सापळा लावला. गायकवाड दुचाकीवरून जात असतानाच त्याला पकडले. विचारणा केल्यावर त्याने पोत्यात शेतीचे साहित्य असल्याचे सांगून दिशाभूल केली; परंतु झडती घेतल्यानंतर त्यात नऊ किलो चंदनाचा गाभा सापडला. त्यानंतर पोलिसांनी गाभा व दुचाकी असा ४१ हजार रुपयांच्या मुद्देमालासह आरोपीला चकलांबा पोलिसांच्या स्वाधीन करत त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

ही कारवाई पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अप्पर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर, पोलिस निरीक्षक संतोष साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक श्रीराम खटावकर, संजय जायभाय, रामदास तांदळे, मारुती कांबळे, बाळकृष्ण जायभाये, राजू पठाण, अर्जुन यादव, आदींनी केली.

पाच वर्षांपासून फरार आरोपीलाही बेड्याबीड शहरासह केज व दिंद्रूड येथून दुचाकी चोरणारा सुमंत मुंडे (रा.वडवणी) हा पाच वर्षांपासून फरार होता. त्याला सुरुवातीला ताब्यात घेऊन जवळपास १५ पेक्षा जास्त दुचाकीही हस्तगत केल्या, परंतु अल्पवयीन असल्याने योग्य ती कारवाई करून त्याला सोडण्यात आले होते. तेव्हापासून तो फरार होता. आता सज्ञान झाला असून, वडवणीतून त्याला याच पथकाने बेड्या ठोकल्या. त्याला शिवाजीनगर पोलिसांच्या स्वाधीन केल्याचे उपनिरीक्षक खटावकर यांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीड