शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

लाचप्रकरणी भू- वैज्ञानिकासह आवेदकाला सक्तमजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 16:39 IST

शिवकालीन पाणी साठवण योजनेंतर्गत बंधाऱ्याचे काम पूर्ण करुन निधी मिळण्यासाठीचा प्रस्ताव मंजुरीसाठी मागितली होती लाच

बीड : शिवकालीन पाणी साठवण योजनेंतर्गत ग्रामपंचायतीने दाखल केलेला प्रस्तावाला मंजुरी देण्यासाठी १५ हजार रुपयांची लाच घेतल्याचा आरोप सिद्ध झाल्याने भू वैज्ञानिक कार्यालयातील वरिष्ठ सहायक प्रकाश पुरी व आवेदक बाबासाहेब मनेरी या दोघांना प्रमुख जिल्हा सत्र न्या. अंजु शेंडे यांच्या न्यायालयाने शुक्रवारी सक्तमजुरीची शिक्षा  सुनावली. याप्रकरणी सरकारी पक्षाच्या वतीने सहाय्यक सरकारी वकील मिलिंद वाघिरकर यांनी काम पाहिले.

शिवकालीन पाणी साठवण योजनेंतर्गत बंधाऱ्याचे काम पूर्ण करुन निधी मिळण्यासाठीचा प्रस्ताव उपसरपंच पांडुरंग नागरगोजे यांनी भू- वैज्ञानिक कार्यालयाकडे सादर केला होता. हे काम अंदाजे १२ लाख रूपयांचे होते. यामध्ये ४० टक्के रक्कम ही भू- वैज्ञानिक कार्यालयाकडून मिळणार होते. या प्रस्तावास मंजूरी देण्यासाठी तेथे कार्यरत वरिष्ठ सहाय्यक प्रकाश पुरी यांनी १५ हजार रुपयांची मागणी केली होती. तक्रारदाराने याबाबत एसीबीकडे तक्रार दिली. एसीबीच्या  पथकाने २१ सप्टेंबर २०१० मध्ये  सापळा रचला. तक्रारदाराने प्रकाश पुरी यांना कार्यालयाच्या परिसरात पैसे दिले. त्यांनी हे पैसे घेऊन बाबासाहेब मनेरी यांचेकडे सुपूर्द केले.

मात्र, सापळा रचल्याचे लक्षात येताच प्रकाश पुरी यांनी परिसरातून पळ काढला होता. पथकाने मनेरी यास ताब्यात घेऊन बीड शहर पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल केला होता. प्रकरणाचा तपास करून एसीबीचे आर.टी. रेंगे यांनी  हे प्रकरण प्रमुख सत्र न्यायालयात दाखल केले. याप्रकरणी न्यायालयाने पंच गणेश सारूक, डॉ. इरफान शाहा, रामेश्वर रेंगे यांच्या साक्षी घेऊन आरोपी प्रकाश पुरी यास १ वर्षे सक्त मजूरी आणि ५ हजार रुपये दंड सुनावला. तसेच बाबासाहेब मनेरी यास ६ महिने शिक्षा आणि एक हजार रुपये दंड सुनावला. 

टॅग्स :Bribe Caseलाच प्रकरणCourtन्यायालयCrime Newsगुन्हेगारीBeedबीड