शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
2
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
3
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
4
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
5
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
6
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
7
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
8
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी
9
वयाच्या तिशीत ‘हे’ ५ आर्थिक नियम शिका! तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही
10
Swapna Shastra: स्वप्नात स्वतःचा मृत्यू पाहणे हे शुभ की अशुभ लक्षण? स्वप्नशास्त्र काय सांगते पाहू
11
पंडित नेहरुंच्या शब्दांनी भाषणाची सुरुवात; न्यूयॉर्कचे पहिले मुस्लिम महापौर ममदानींचा व्हिडिओ व्हायरल...
12
"लाडली, लक्ष्मी, बहीण..."; निवडणूक वर्षात महिलांसाठी रोख रकमेचा महापूर; सरकारं घाट्यात! आरबीआयनं आधीच दिलाय मोठा इशारा
13
मिर्झापूरजवळ भीषण अपघात; रेल्वे रुळ ओलांडताना 'कालका मेल'खाली चिरडून ६ भाविकांचा मृत्यू
14
Sonam Raghuvanshi : ना कागद, ना कापड... राजा रघुवंशीच्या हत्येनंतर धूर्त सोनमने कसे पुसले हत्यारावरचे रक्ताचे डाग?
15
"RJD, काँग्रेसने बिहारला गुन्हेगारी, जातीय हिंसाचाराची राजधानी बनवलं", योगींचा जोरदार हल्लाबोल
16
बॉलिवूड अभिनेत्याचे अनेक अभिनेत्रींसोबत शारीरिक संबंध, पत्नीला संशय येताच मागे लावला डिटेक्टिव्ह अन् मग...
17
समृद्धी महामार्गावर १५०० सीसीटीव्ही कॅमेरे; नागपूर ते मुंबईपर्यंत ‘वॉच’
18
SBI ची नोकरी सोडून सुरू केली शेती, आज ७ कोटींच्या हेलिकॉप्टरचा मालक! ५ एकरापासून सुरुवात
19
Banganga Aarti: बाणगंगा महाआरतीसाठी नियमावली कठोर, 'क्यूआर कोड'सह पूर्व-नोंदणी अनिवार्य!

एसबीआयच्या मुख्य शाखेत सर्व्हर रुमला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2019 23:26 IST

शहरातील जालना रोडवरील स्टेट बॅँक आॅफ इंडियाच्या क्षेत्रीय कार्यालयाच्या इमारतीला मागील बाजुला असलेल्या सर्व्हर रुम, यूपीएस बॅटरी रुमला अचानक आग लागल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली.

ठळक मुद्देशॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज : अडीच तासानंतर अग्निशामक जवान, तरुणांनी मिळवले नियंत्रण

बीड : शहरातील जालना रोडवरील स्टेट बॅँक आॅफ इंडियाच्या क्षेत्रीय कार्यालयाच्या इमारतीला मागील बाजुला असलेल्या सर्व्हर रुम, यूपीएस बॅटरी रुमला अचानक आग लागल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. शार्टसर्किटमुळे ही आग लागल्याचे सांगण्यात आले असून अग्निशामक दलाचे जवान आणि धाडसी तरुणांनी आग आटोक्यात आणण्यासाठी जवळपास अडीच तास शर्थीचे प्रयत्न केले. दरम्यान या घटनेत डाटा बॅँकेसह महत्वाची संपदा सुरक्षित असल्याचे सूत्रांनी सांगितले.शहरातील जालना रोडवर एसबीआयचे क्षेत्रीय कार्यालय आहे. रविवारी सायंकाळी बॅँकेच्या इमारतीमधून धूराचे लोट निदर्शनास येताच जागरुक नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. बॅँकेच्या इमारतीच्या मागील बाजुने धूर निघत असल्याचे लक्षात येताच सीज फायरने आग विझविण्याचा प्रयत्न तेथील कर्मचाऱ्यांनी केला. तर सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. तर पोलीस विभागाला कळविण्यात आले. अग्निशमक दलाचे मुख्य अग्निशमन अधिकारी भागवत धायतडक, रमेश आदमाने, हनमंत ससाणे, प्रमाकर मस्के, लक्ष्मण टेकाळे, अमोल सांगळे, गोरख ढाकणे, अमोल नागरे, गोविंद केंद्रे, आकाश राठोड, सूरज राठोड, तुकाराम राठोड आदी जवान दोन वाहनांसह तत्काळ पोहचले.इमारतीच्या मागील बाजुस बॅँकेचे सर्व्हर रुम तसेच यूपीएस बॅटरी रुम आहे. तेथून धूर निघत असल्याने आग विझविण्याचे प्रयत्न सुरु झाले. तोपर्यंत इमारतीमध्ये धुर पसरला होता. काही धाडसी तरुण व नगरसेवकांसह बॅँकेच्या सेवकांनी अग्निशामक जवानांना मदत करत इमारतीत जाऊन धूर मोकळा करण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न केले. दरम्यान पसिरात मोठी गर्दी झाल्याने मुख्य रस्त्यावर वाहतुकीची कोंडी झाली होती. ज्या रूममधून धूर येत होता, तिथपर्यंत पोहचून आग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न दोन तास सुरुच होते.सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास आग नियंत्रणात आणण्यात यश आले. दरम्यान आग इतरत्र पसरु नये व दुर्घटना घडू नये म्हणून या भागातील विद्युत पुरवठा काही वेळ बंद ठेवावा लागला. आगीत सर्व्हर, बॅटरी रुमसह फर्निचरचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.रविवारी सुटी असल्याने परिसरात शुकशुकाट होता. या घटनेमध्ये नेमके किती आणि कोणते नुकसान झाले आहे हे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पाहणीनंतर स्पष्ट होणार आहे. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी होते.डाटा बॅँक सुरक्षित : ग्राहकांना अडचण नाहीया आगीत ग्राहकांना व बॅँकेला अडचणी होईल असे नुकसान झाले नसल्याचे समजते. डाटा बॅँक तसेच महत्वाच्या फाईल सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान बॅँकेचे क्षेत्रीय प्रबंधक नंदकिशोर भोसले हे हैद्राबाद येथे बैठकीसाठी गेले होते. रात्री नऊच्या सुमारास ते बीडकडे परतत होते.जीव धोक्यात घालून जवान इमारतीवरबाहेरून आग आटोक्यात येत नसल्याचे समजल्यावर बीड पालिकेच्या अग्निशमन विभागाचे दोन जवान शिडीच्या आधारे आग लागलेल्या खिडकीच्या ठिकाणी पोहचले. जीव धोक्यात घालून दोन जवानांनी खिडकीतून आत पाणी मारत आग विझविण्याचा प्रयत्न केला. खिडकीतून धुराचे लोट बाहेर येत होते. याला झुगारून हे कर्मचारी आग विझवित होते.

टॅग्स :BeedबीडSBIएसबीआयfireआग