शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

आधी सेवा द्या,मग मुख्यालयी राहण्याचे बोला;डॉक्टर-कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून कामकाज

By सोमनाथ खताळ | Updated: November 4, 2022 12:25 IST

आरोग्य विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सर्व अधिकारी, डॉक्टर, कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहणे बंधनकारक केले आहे.

बीड : मुख्यालयी राहणे आवश्यकच आहे, हे मान्य आहे. परंतू निवास्थाने नाहीत, आहेत तिथे पडझड झालेली आहे. ग्रामीण भागात किरायाणे घर मिळत नाही. मुलांचे शिक्षण, कुटूंबाच्या अनेक अडचणी आहेत. सोयी, सुविधा काहीच नाहीत, मग मुख्यालयी रहायचे कसे? असा सवाल उपस्थित करत डॉक्टर, कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी सकाळीच काळ्या फिती लावून कामकाज सुरू केले आहे. आगोदर आमच्या समस्या सोडवा आणि मगच मुख्यालयाचे बोला, असेही त्यांनी म्हटले आहे.

आरोग्य विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सर्व अधिकारी, डॉक्टर, कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहणे बंधनकारक केले आहे. जे राहणार नाहीत, त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशाराही दिला होता. त्यामुळे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अमोल गिते यांनी सर्वांना मुख्यालयी राहण्याच्या सुचना केल्या. बुधवारी रात्री अचानक ‘मिशन सतर्क’ मोहिम राबवून मुख्यालयी न राहणाऱ्या डॉक्टर, कर्मचाऱ्यांचा पंचनामा केला. यात तब्बल ५७ डॉक्टर, कर्मचारी गैरहजर आढळले. या सर्वांना नोटीस बजावल्या जाणार आहेत. डॉ.गिते यांनी आयुक्तांच्या आदेशाचे पालन केले.

दरम्यान, मुख्यालयी राहणे आवश्यक असले तरी आमच्याही सोयी, सुविधांचे पहावे, आमच्या अडचणी सोडवाव्यात, कामाचे तास निश्चीत करावेत, सुरक्षेची हमी घ्यावी यासारख्या विविध मागण्या डॉक्टर कर्मचाऱ्यांनी केल्या आहेत. सुविधा नसतानाही मुख्यालयी राहण्याबाबत केलेल्या सक्तीचा निषेध म्हणून शुक्रवारी सकाळपासूनच जिल्ह्यातील सर्वच आरोग्य केंद्रातील डॉक्टर, कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून कामकाज सुरू केले. आता  दोन दिवसानंतर माेठे आंदोलन करण्याचा इशाराही संघटनांनी दिला आहे. असे असले तरी अद्यापही साधे निवेदनही एकाही संघटनेने दिलेले नाही. त्यामुळे आतापर्यंत तरी संघटना केवळ सोशल मिडीयावरच ॲक्टीव्ह असल्याचे दिसत आहे.

आमच्याही समस्या आहेत मुख्यालयी रहायला काहीच अडचण नाही. परंतू काही ठिकाणी निवासस्थाने नाहीत, जेथे आहेत तेथे अवस्था बिकट आहे. पाणी, वीज अशा सुविधा नाहीत. ग्रामीण भागात किरायाणे घर मिळत नाही. आमच्या कामाचे तास निश्चीत नाहीत. आमच्या पण खुप समस्या आहेत. यावरही मार्ग काढावा आणि मग मुख्यालयी राहण्याबाबत बोलावे. प्रशासनाचा निषेध म्हणूनच आज जिल्हाभरात काळ्या फिती लावून कामकाज करत आहोत. सोमवारी यावर पुढील निर्णय घेतला जाईल.- डॉ.नितीन मोरे, कार्याध्यक्ष, मॅग्मो संघटना बीड

 

टॅग्स :Beedबीडtukaram mundheतुकाराम मुंढेdoctorडॉक्टर