शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘कारखान्यांची साखर विकून एफआरपीची रक्कम वसूल करा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 00:14 IST

गाळपानंतर १४ दिवसांच्या आत ऊस उत्पादकांना एफआरपीची रक्कम अद्याप न देणाऱ्या जिल्ह्यातील वैद्यनाथ, लोकनेते सुंदरराव सोळंके, जयभवानी आणि एनएसएल शुगर्स जय महेश या चार साखर कारखान्यांची साखर, मोलॅसिस आणि बगॅस विकून जमा रकमेतून महसुलाची थकबाकी समजुन वसूल करण्याचे आदेश राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिले

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : गाळपानंतर १४ दिवसांच्या आत ऊस उत्पादकांना एफआरपीची रक्कम अद्याप न देणाऱ्या जिल्ह्यातील वैद्यनाथ, लोकनेते सुंदरराव सोळंके, जयभवानी आणि एनएसएल शुगर्स जय महेश या चार साखर कारखान्यांची साखर, मोलॅसिस आणि बगॅस विकून जमा रकमेतून महसुलाची थकबाकी समजुन वसूल करण्याचे आदेश राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिले आहेत. वसुलीची कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकाºयांना प्राधिकृत करण्यात आले आहे.२०१८-१९ च्या गाळप हंगामातील एफआरपीची रक्कम साखर कारखान्यांकडून ऊस उत्पादकांना मिळाली नाही. याप्रश्नी विविध शेतकरी संघटनांनी आंदोलने केली. त्या त्या वेळी जनभावना लक्षात घेत साखर आयुक्त व प्रादेशिक सहसंचालकांनी संबंधित कारखान्यांना समजही दिलेली आहे. ऊस नियंत्रण कायद्यानुसार गाळपानंतर १४ दिवसांच्या आत ऊस पुरवठादारांना उसाची किंमत मिळणे बंधनकारक आहे.वैद्यनाथ कारखान्याने १६ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर दरम्यान १ लाख ६३ हजार ३१० मेट्रीक टन उसाचे गाळप केले. याची एफआरपी रक्कम ३२ कोटी ६४ लाख रुपये आहे, जी ऊस उत्पादकांना अदा केलेली नाही. जयभवानी कारखान्याने २३ आॅक्टोबर ते ३१ डिसेंबर कालावधीत १९२ हजार १९१ मेट्रीक टन उसाचे गाळप केले. या पैकी ९ कोटी ४६ लाख रुपये ऊस उत्पादकांना अदा केले. मात्र या कारखान्याकडे २८ कोटी ९० लाख रुपये १५ टक्के व्याजासह थकित आहे.एनएसएल शुगर्स जयमहेश कारखान्याने १७ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर दरम्यान २ लाख ७२ हजार ८७६ मे. टन उसाचे गाळप केले. या कारखान्याने एफआरपीच्या ५८ कोटींपैकी १३ कोटी २८ लाख रुपये अदा केले तर ४५ कोटी ५३ लाख रुपये व्याजासह थकित आहे. तर लोकनेते सुंदरराव सोळंके कारखान्याने २४ आॅक्टोबर ते ३१ डिसेंबरपर्यंत ३ लाख २४ हजार ३६४ मे. टन उसाचे गाळप केले. एफआरपीची देय रक्कम ६४ कोटी ६ लाखापैकी ४७ कोटी ९३ लाख रुपये अदा केले. तर १६ कोटी १३ लाख रुपये व्याजासह थकित आहे. नियमानुसार एफआरपी अदा करण्याबाबत साखर आयुक्तांनी सुनावणी घेतली. तरीही कसूर केल्याने हे कारखाने कारवाईस पात्र ठरले.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेcommissionerआयुक्त