शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

आनंदगाव शिवारात वाघासह बछड्यांचे दर्शन; शेतकऱ्याच्या दाव्याने परिसरात घबराट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 14:16 IST

आनंदगाव शिवारातील पाणवठ्यावर रात्री वाघ आणि बछडे दिसल्याचे शेतकऱ्याने सांगितले

ठळक मुद्देवन विभागास घटनास्थळी जाऊन पंचनामा करण्याचे तहसील प्रशासनाचे आदेश

दिंद्रुड ( बीड ) : माजलगाव तालुक्यातील आनंदगाव येथे शेतकऱ्याने सोमवारी रात्री वाघीण व दोन बछडे पाणवठ्यावर आढळून आल्याचा दावा केला आहे. या भागात काही वर्षांपूर्वी वाघाने दर्शन दिले होते. यामुळे आता पुन्हा एकदा शेतात वाघ आणि बछडे दिसल्याने परिसरातील ग्रामस्थ भयभीत झाले आहेत.

अशोक डाके असे वाघ पाहणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. सोमवारी रात्री शेतात असताना एका पाणवठ्यावर त्यांना एक वाघीण व दोन बछडे दिसून आल्याचे डाके यांनी सांगितले. त्यांनी लागलीच याची माहिती ग्रामस्थांना दिली. ग्रामस्थांनी माहिती वन विभाग व माजलगाव तहसील कार्यालयास दिली आहे. दरम्यान, चार दिवसांपूर्वी येथील संभाजी लांडगे यांच्या शेतात एक गाय मृतावस्थेत आढळून आली होती. शेतकऱ्यांना कुत्र्याने हल्ला करून गायीची शिकार केल्याचा संशय आल्यामुळे गावकऱ्यांनी मृत गाय शेतात पुरली. वाघ दिसल्याची वार्ता सर्वत्र पसल्याने आनंद गाव व परिसरातील शेतकरी शेतात जाण्यासाठी घाबरत आहेत.

दरम्यान, सात वर्षांपूर्वी येथील गिरीश थावरे यांच्या शेतात एक बिबट्या वनविभागाने जेरबंद केला होता. या घटनेनंतर या परिसरात पुन्हा वाघीण व दोन बछडे आल्याच्या बातमीमुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड घबराहट निर्माण झाली आहे. प्रशासनाने तात्काळ या घटनेची दखल घेण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तहसील प्रशासनाने याची दखल घेत वन विभागाला तत्काळ पंचनामा करण्याचे आदेश दिले आहेत. शेत शिवारात काही पंज्याचे निशाण आढळून आले आहेत. याच्या तपासणी अंती आणि वन विभागाचा पंचनाम्यानंतरच अधिक माहिती मिळू शकेल.    

पंचनामा करण्याचे आदेश आनंदगाव ग्रामस्थांनी या घटनेची माहिती दिली असून वन विभागास घटनास्थळी जाऊन पंचनामा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत - वैशाली पाटील, तहसीलदार, माजलगाव

टॅग्स :TigerवाघBeedबीडforestजंगल