शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक प्रशिक्षणात वादळाचा धिंगाणा, सात जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 00:31 IST

बीड लोकसभा निवडणुकीचे प्रशिक्षण सुरु असताना अचानक वादळी वाऱ्यामुळे मंडप कोसळून सात प्रशिक्षणार्थी जखमी झाले.

लोकमत न्यूज नेटवर्ककेज : बीड लोकसभा निवडणुकीचे प्रशिक्षण सुरु असताना अचानक वादळी वाऱ्यामुळे मंडप कोसळून सात प्रशिक्षणार्थी जखमी झाले. केज येथील वसंत महाविद्यालयाच्या प्रांगणात रविवारी दुपारी ही घटना घडली. जखमींना येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. दरम्यान अचानक निर्माण झालेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या घटनेवर संपूर्ण नियंत्रण मिळवण्यात आले असून कोणीही काळजी करू नये तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन शोभा जाधव यांनी केले आहेलोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान प्रक्रिया आणि घ्यावयाची काळजी याबाबत दुसऱ्या प्रशिक्षणासाठी रविवारी दोन हजार कर्मचारी सहभागी झाले होते. कर्मचाऱ्यांना सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी शोभा जाधव यांच्या उपस्थितीत प्रशिक्षण देण्यात येत होते. दुपारी साडेतीनच्या सुमारास अचानक आलेल्या वादळी वाºयामुळे मंडपाचे लोखंडी पाईप व अ‍ॅँगल वाकले. मंडप पडल्याने तेथे बसलेले प्रशिक्षणार्थी कर्मचारी जखमी झाले आहेत.जखमींमध्ये पठाण उमेदा बेगम (वय ३८), स्नेहा हरिहर बर्दापुरे ,(३०) हुमेरा फिरोज शेख (४६), आस्मिन सुलतान समशोद्दीन (४०), सायरा शेख (४०) , खाजिया खिरा (५०) , शेख फातिमा तनवीर (सर्व रा. अंबाजोगाई) या सात महिला कर्मचा-यांचा समावेश आहे.घटनेची माहिती मिळताच उपजिल्हा रुग्णालयाचे कर्मचारी संदीप मोराळे सह आरोग्य कर्मचा-यांनी रुग्णवाहिकेतून जखमींना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय व नंतर अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात दाखल केले आहे. या मंडपाच्या सुरक्षिततेची तपासणी अथवा पाहणी केली नसल्याची बाब या घटनेमुळे समोर आली आहे.

टॅग्स :beed-pcबीडAccidentअपघातLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक