शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

ए वाचवा, वाचवा ना कुणी तरी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2018 00:18 IST

ऐ वाचवा, वाचवा ना कुणीतरी..., उचला रे कुणीतरी.. हे शब्द आहेत, सुमित वाघमारेची पत्नी भाग्यश्रीचे.

ठळक मुद्देमाणुसकी हरवली ? : सुमित रक्ताच्या थारोळ्यात, पत्नी भाग्यश्रीची मदतीसाठी हाक, फोटो, व्हिडिओ काढत होते बघे

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : ऐ वाचवा, वाचवा ना कुणीतरी..., उचला रे कुणीतरी.. हे शब्द आहेत, सुमित वाघमारेची पत्नी भाग्यश्रीचे. बुधवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास परीक्षा देऊन परतणाऱ्या सुमितवर प्रेमप्रकरणातून भाग्यश्रीचा भाऊ बालाजी लांडगे आणि त्याच्या मित्रांनी धारदार शस्त्राने वार करुन खून केला होता. त्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सुमितला वाचविण्यासाठी भाग्यश्री मदत मागत होती. मात्र, उपस्थितांनी केवळ फोटो आणि व्हिडीओ बनविण्यातच धन्यता मानली. जर सुमितला तात्काळ रुग्णालयात दाखल केले असते तर ‘माझं लेकरू वाचलं असतं’ असा टाहो सुमितच्या आईने फोडला. या घटनेवरुन आजही नागरिक गंभीर घटनेत मदतीसाठी पुढे येत नसल्याचे समोर आले आहे.सुमित वाघमारे (रा. तालखेड, ता. माजलगाव ह. मु. नागोबा गल्ली, बीड) या युवकाचा बुधवारी सायंकाळी तेलगाव नाक्यावर दोघांनी धारदार शस्त्रांनी वार करुन खून केला होता. त्यानंतर रात्री उशिरा सुमितची पत्नी भाग्यश्री हिच्या फिर्यादीवरुन तिचा भाऊ बालाजी लांडगे व त्याचा मित्र संकेत वाघ विरोधात गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी आरोपीच्या शोधासाठी पाच पथके नियुक्त केली असून, गुरुवारी सायंकाळपर्यंत आरोपींना अटक झालेली नव्हती.खून झाला त्यावेळी सुमित हा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. परीक्षेमुळे विद्यार्थ्यांची मोठी गर्दी होती. सुमित खाली कोसळल्यानंतर लोकांनी गर्दी केली. भाग्यश्री त्याच्या अंगावर पडून ऐ वाचवा, वाचवा ना कुणीतरी..., उचला रे कुणीतरी... असा हंबरडा फोडत मदत मागत होती. मात्र, कोणीही पुढे आले नाही. याचा अनेकांनी व्हिडीओ बनविला, तर काहींनी फोटो काढले. अखेर चौघांनी एका रिक्षाचालकाला विनंती करीत सुमितला जिल्हा रुग्णालयात आणले. मात्र, तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाला. तेथे भाग्यश्रीसह सुमितच्या नातेवाईकांनी आक्रोश केला.नातेवाईकांनी मांडली एसपींपुढे कैफियतआरोपींना अटक करुन त्यांना कडक शिक्षा करा या मागणीसाठी गुरुवारी सकाळीच भाग्यश्रीसह नातेवाईकांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात धाव घेतली. अधीक्षक जी. श्रीधर यांची भेट घेऊन कैफियत मांडली. यावेळी कार्यालय परिसरात तगडा बंदोबस्त तैनात केला होता.आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा नातेवाईकांनी घेतला होता. मात्र, पोलिसांनी आश्वासन दिल्यानंतर त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला.पोलिसांनी बजावली होती नोटीस२५ आॅक्टोबर रोजी भाग्यश्री घरातून निघून गेल्यावर तिच्या वडिलांनी दिलेल्या माहितीवरून मिसींग तक्रार शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल झाली.त्यानंतर ४ नोव्हेंबर रोजी भाग्यश्री व सुमित दोघेही स्वत:हुन ठाण्यात हजर झाले. यावेळी त्यांनी आपण स्वखुशीने लग्न केल्याचे कबुली देत सर्व कागदपत्रे पोलिसांना दिली.यावेळी भाग्यश्रीने आपले वडील व आत्या यांच्यापासून जिवाला धोका असल्याचे सांगितले. त्याप्रमाणे दोघांविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला होता.दोघांनाही कलम १४९ नुसार नोटीस बजावली होती. या तक्रारीत बालाजी लांडगेचे नाव नव्हते, असे पोलीस सूत्रांकडून समजते.

टॅग्स :BeedबीडMurderखूनCrime Newsगुन्हेगारी