शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘खोक्या’ला अखेर बेड्या; उत्तर प्रदेश पोलिसांच्या मदतीने बीड पोलिसांची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2025 08:11 IST

ट्रॅव्हल्सने गाठले प्रयागराज

बीड : भाजपचे आ. सुरेश धस यांचा कार्यकर्ता कुख्यात आरोपी सतीश ऊर्फ खोक्या निराळ्या भोसले याच्याविरोधात चार गंभीर गुन्हे दाखल होते. तो सहा दिवसांपासून फरार होता. छत्रपती संभाजीनगरहून तो ट्रॅव्हल्सने प्रयागराजला (उत्तर प्रदेश) गेला. तेथे लपण्याआधीच बीड पोलिसांनी उत्तर प्रदेश पोलिसांच्या मदतीने त्याला बेड्या ठोकल्या. शुक्रवारी सकाळी त्याला बंदोबस्तात बीडला आणले जाणार आहे. बुलढाणा जिल्ह्यातील एका व्यक्तीला शिरूरकासार तालुक्यातील बावी येथे आणून पाच ते सहा जणांनी अर्धनग्न करून बॅटने मारहाण केली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी दिलीप ढाकणे व महेश ढाकणे या बाप-लेकाला मारहाण केल्याचाही व्हिडीओ व्हायरल झाला. 

याप्रकरणी शिरूर पोलिस ठाण्यात दोन गुन्हे दाखल झाले. त्यानंतर वन विभागाने खोक्याच्या घरी छापा टाकून तपासणी केली. यात वाळलेले मांस आणि शिकारीचे साहित्य जप्त केले. 

या सर्व गुन्ह्यांमध्ये खोक्या हा पोलिसांना हवा होता; परंतु तो पोलिसांना सापडत नव्हता. अखेर या खोक्याला बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले आहे.

पुणे, अहिल्यानगरमध्ये मुक्काम घटनेचा व्हिडीओ खोक्याने सोशल मीडियावर व्हायरल केला. त्यानंतर  त्याने अहिल्यानगर गाठले. तेथून पुणे आणि मग छत्रपती संभाजीनगरला आला. मंगळवारी दुपारी १२ वाजता खोक्या ट्रॅव्हल्सने प्रयागराजला गेला. तेथे उतरून लपण्याच्या तयारीत असतानाच यूपी पोलिसांनी त्याला पकडले. 

तेथे थांबण्याची तयारी 

गळ्यात सोने, पैशाची उधळण, व्हीआयपी वाहने, हेलिकॉप्टरमधून फिरतानाचे खोक्याचे व्हिडीओ व्हायरल झाले होते; परंतु गुन्हा दाखल होताच खोक्याने सोने काढले. प्रयागराजला पोहोचला. सोबत पाठीवर एक पिशवी होती. आठवडाभर तेथेच थांबण्याची तयारी त्याची होती.

जामिनासाठी अर्ज 

खोक्याने १० मार्च रोजी अटकपूर्व जामिनासाठी बीडच्या न्यायालयात अर्ज केला होता. त्याची सुनावणी बुधवारी होणार होती; परंतु मागावरील बीड पोलिसांनी त्याआधीच बेड्या ठोकल्या. 

खोक्या भोसले हा प्रयागराजमध्ये असल्याचे समजले. बीड आणि प्रयागराज पोलिस यांनी समन्वय साधून त्याला अटक केली. ट्रांझिट रिमांड आणि इतर कायदेशीर कारवाई करून त्याला बीडमध्ये आणले जाईल. त्याला मदत करणाऱ्यांवरही कारवाई करू - नवनीत काँवत, पोलिस अधीक्षक, बीड 

टॅग्स :BeedबीडSuresh Dhasसुरेश धस