शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

तपोरत्न माजलगावकर महाराजांना साश्रुनयनांनी अखेरचा निरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:38 IST

माजलगाव(जि.बीड) : येथील सद्गुरू श्री मिस्कीन स्वामी मठ संस्थानचे मठाधिपती श्री तपोरत्नं प्रभू पंडिताराध्य शिवाचार्य माजलगावकर महाराज यांना शनिवारी ...

माजलगाव(जि.बीड) : येथील सद्गुरू श्री मिस्कीन स्वामी मठ संस्थानचे मठाधिपती श्री तपोरत्नं प्रभू पंडिताराध्य शिवाचार्य माजलगावकर महाराज यांना शनिवारी हजारो भाविकांंनी साश्रुनयनांनी अखेरचा निरोप दिला. सकाळी ११ वाजेच्या सुमारास हिमवत्केदार महापीठाचे जगद्गुरू श्री श्री श्री १००८ भीमाशंकरलिंग शिवाचार्य महास्वामीजी यांच्या मार्गदर्शनाखाली समाधी विधी पार पडला. यावेळी हजारो शिवभक्तांनी ‘ॐ नमः शिवाय’चा गजर केला.

शुक्रवारी शिवाचार्य माजलगावकर महाराजांचे निर्वाण झाल्यानंतर जिल्ह्यासह महाराष्ट्र आणि राज्याबाहेरील भक्तांची अंत्यदर्शनासाठी रीघ लागली होती. यावेळी जगद्गुरू भीमाशंकरलिंग शिवाचार्य महास्वामीजी, वेदांताचार्य सिद्धलिंग शिवाचार्य महाराज साखरखेर्डेकर, श्रीगुरू शंकरलिंग शिवाचार्य महाराज अंबाजोगाईकर, श्रीगुरू नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज पूर्णेकर, श्रीगुरू पंचाक्षरी शिवाचार्य महाराज माळकवठेकर, पाथरीच्या कांचबसवेश्वर मठाचे श्रीगुरू काशीनाथ शिवाचार्य महाराज, श्रीगुरू सिद्धलिंग शिवाचार्य महाराज शिखर शिंगणापूरकर, श्रीगुरू विरुपाक्ष शिवाचार्य महाराज मुखेडकर, श्रीगुरू विरुपाक्ष शिवाचार्य महाराज मानूरकर, श्रीगुरू महादेव शिवाचार्य महाराज कळमनुरीकर, श्रीगुरू बादेश्वर शिवाचार्य महाराज गिरगावकर, श्रीगुरू महन्तमा स्वामी महाराज थोरवेकर, वेदांताचार्य सद्गुरू दिगंबर शिवाचार्य महाराज थोरवे मठ वसमतकर, श्रीगुरू सूर्यकांतेश्वर शिवाचार्य महाराज, श्रीगुरू चन्नबसव शिवाचार्य गुरू महालिंग शिवाचार्य बर्दापूरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा या राज्यांतील हजारो भक्तगणांनी माजलगावकर महाराज यांच्या समाधी विधीस उपस्थित होते.

आमदार प्रकाश सोळंके, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक डक, माजी खासदार चंद्रकांत खैरे, आमदार राधाकृष्ण होके पाटील, मोहनराव सोळंके, रमेश आडसकर, अप्पासाहेब जाधव, अशोक होके पाटील, ज्ञानेश्वर मेंडके, अरुण राऊत, ॲड. सुरेश दळवे आदींसह विविध पक्षांचे नेते, कार्यकर्त्यांनी तपोरत्नं महाराजांच्या पार्थिवदेहाचे अंत्यदर्शन घेतले.

110921\purusttam karva_img-20210911-wa0024_14.jpg~110921\purusttam karva_img-20210911-wa0019_14.jpg

तपोरत्न माजलगावकर महाराजांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप~