शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

भ्रष्टाचारप्रकरणी जनतेतून निवडून आलेल्या नांदूर हवेलीच्या सरपंच बडतर्फ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 00:09 IST

चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीतून १३ लाख १९ हजार ७८७ रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी तालुक्यातील नांदूर हवेली येथील सरपंच संताबाई सुभाष बुधनर यांना बडतर्फ करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीतून १३ लाख १९ हजार ७८७ रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी तालुक्यातील नांदूर हवेली येथील सरपंच संताबाई सुभाष बुधनर यांना बडतर्फ करण्यात आले. जि.प. सीईओंच्या अहवालानंतर अप्पर आयुक्त डॉ. विजयकुमार फड यांनी ही कारवाई केली.नांदूर हवेली ग्रामपंचायतमध्ये विकासकामांच्या नावाखाली १४ व्या वित्त आयोगाच्या निधीमध्ये गैरव्यवहार झाला होता. यासंदर्भात सरंपच संताबाई बुधनर व ग्रामसेवकाविरुध्द येथील शाहेद पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश बुधनर, कुंडलिक बुधनर, शेख शहेबाज करीम या सदस्यांनी आक्षेप नोंदवला होता. यासंदर्भात सीईओ अमोल येडगे यांच्या आदेशावरुन चौकशी झाली होती. यात गंभीर स्वरुपाचा गैरव्यवहार झाल्याचे समोर आले होते. सीईओ येडगे, डेप्युटी सीईओ डॉ. सुनील भोकरे यांनी १६ मार्च २०१९ रोजी अप्पर आयुक्तांना अहवाल सादर केला होता. त्याआधारे अप्पर आयुक्त क्र. २ डॉ. विजयकुमार फड यांनी सुनावणी घेतली. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८, ३९ (१) प्रमाणे सरपंच बुधनर यांना बडतर्फ करण्याचे आदेश काढले. उर्वरित पदावधीत सरपंचपदासाठी निवडणूक लढविण्यासाठी त्यांना अपात्र ठरविले आहे. १४ व्या वित्त आयोगातील निधीतून अपहार केल्याप्रकरणी थेट जनतेतून निवडून आलेल्या सरपंचावर कारवाई होऊन बडतर्फ होण्याची पहिलीच घटना असल्याचे शाहेद पटेल म्हणाले.

टॅग्स :BeedबीडsarpanchसरपंचCorruptionभ्रष्टाचार