बीड : येथील श्री बंकटस्वामी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने संत गाडगेबाबा महाराज जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाप्रसंगी प्राचार्य डॉ. विवेक मिरगणे, उपप्राचार्य डॉ. शिवाजी मोरे, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. बी. जी. काळे तसेच कार्यालयीन अधीक्षक एस. एन. भारती यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
याप्रसंगी प्राचार्य विवेक मिरगणे यांनी गाडगे महाराजांनी केलेला कार्यासंदर्भात मनोगत व्यक्त केले. कनिष्ठ विभागाचे राष्ट्रीय सेवा योजना जिल्हा समन्वयक प्रा. ब्रह्मनाथ मेगडे याप्रसंगी उपस्थित होते. सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. सुनील त्रिभुवन यांनी केले. आभार राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. अरुण दैतकार यांनी मानले. यावेळी विद्यार्थी, प्राध्यापक तसेच इतर प्रशासकीय कर्मचारी उपस्थित होते.