शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

वाळू ‘रेट कार्ड’ प्रकरणात घेतले जाणार जबाब -पोद्दार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2019 23:50 IST

वाळू वाहतूक व ठेकेदारांनी जून महिन्यात वाळू वाहतूक करण्यासाठी कोणत्या अधिकाऱ्यांना किती हप्ता द्यावा लागतो याचे ‘रेट कार्ड’ सह निवेदन जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षक यांना दिले होते.

ठळक मुद्देदोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार कायम : निवेदन दिलेल्यांपैकी काही जणांनी घेतली माघार

बीड : वाळू वाहतूक व ठेकेदारांनी जून महिन्यात वाळू वाहतूक करण्यासाठी कोणत्या अधिकाऱ्यांना किती हप्ता द्यावा लागतो याचे ‘रेट कार्ड’ सह निवेदन जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षक यांना दिले होते. यामधील २० जणांचे तसेच पोलीस अधिकाºयांचे जवाब आतापर्यंत नोंदवण्यात आले आहेत. या सोबतच आणखीही २० वाहतुकदारांचे जवाब नोंदवले जाणार आहेत. याप्रकरणात दोषी आढळल्यानंतर संबंधित पोलीस अधिकाºयांवर नियमानुसार कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी दिली.अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी कारवाई सुरु करत जून महिन्यात संबंधित पोलीस व महसूल अधिकारी यांची बैठक घेतली होती. यावेळी वाळू वाहतूकदार व ठेकेदार यांना देखील बोलावण्यात आले होते. दरम्यान या बैठकीमध्ये एका पोलीस अधिकाºयाने वाळू वाहतूक करणारे चोर आहेत, असे वक्तव्य केले होते. त्यानंतर वाळू वाहतूक करणारे व ठेकेदार वाळू वाहतूक करण्यासाठी महिना ७ लाख ११ हजार रुपये हप्ता पोलीस व महसूल प्रशासनातील अधिकाºयांना द्यावा लागत असल्याचे निवेदन दिले होते. या निवेदनावर २८ जणांनी स्वाक्षरी केल्या होत्या, त्यापैकी काहींचे जबाब तत्कालीन पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या उपस्थितीमध्ये इन कॅमेरा नोंदवले होते. त्यानंतर या निवेदनात सहभागी झालेल्या काही जणांनी या तक्रारीमधून मागार घेतल्याची सुत्रांची माहिती आहे. जे ठाम आहेत त्यांचे जबाब लवकरच नोंदवले जाणार आहेत. त्यासोबतच आणखी २० व्यक्तींचे जवाब नोंदवले जाणार आहेत.या ‘रेट कार्ड’ प्रकरणात काय निष्पन्न होते याकडे सर्वांचे लक्ष लागले असून, चौकशी पूर्ण झाल्यानंतर दोषी आढळल्यास कारवाई होणार असल्याचे संकेत हर्ष पोद्दार यांनी दिले आहेत.निवेदन देणाºयांवर दबाव ?२१ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात पोलीस व वाळू कंत्राटदार - वाहतूकदार झालेल्या बैठकीत आरोप - प्रत्यारोप नाट्यानंतर देण्यात आलेल्या निवेदनावर ४८ जणांनी स्वाक्षरी केल्या होत्या.या निवेदनातील काही जणांवर संबंधित अधिकाºयांकडून दबाव आणला जात असल्याची सूत्रांची माहिती आहे. तसेच काही वाळू वाहतूकदार, ठेकेदारांवर याप्रकरणामुळे कारवाई केली असल्याची देखील चर्चा आहे.

टॅग्स :BeedबीडsandवाळूBeed S Pपोलीस अधीक्षक, बीडcollectorजिल्हाधिकारी