शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

वाळू माफियांना दणका; १० वाहनांवर कारवाई, ३ लाखांचा दंड वसूल

By शिरीष शिंदे | Updated: April 7, 2023 17:55 IST

उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांसह महसूल पथकाची कारवाई

बीड : उपप्रादेशिक परिवहन विभाग व गेवराई तहसील यांच्या संयुक्त पथकाने अवैधरीत्या वाळू तस्करी करणाऱ्या १० वाहनांवर कारवाई केली. सदरील वाहनांवर क्रमांक, रिफ्लेक्टर नसणे या कारणांवरून एकूण २ लाख ८८ हजार ५०० रुपये दंड वसूल करण्यात आला.

गेवराई तालुक्यातील नदीपात्रातून सर्रासपणे अवैधरीत्या वाळू वाहतूक केली जाते. अशा वाहनांवर कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांनी दिल्या आहेत. त्याअनुषंगाने उपप्रादेशिक परिवहन विभाग व महसूल विभाग यांच्यामार्फत संयुक्त तपासणी मोहीम राबविण्यात आली. गेवराई मार्गे बीड शहराकडे येणाऱ्या १० वाहनांची तपासणी केली असता, त्यामध्ये पथकाला वाळू आढळून आली. तसेच, कारवाई करण्यात आलेल्या वाहनांमध्ये क्रमांक नसलेली वाहने, रिफ्लेक्टर नसलेली वाहने आढळून आली. अवैधपणे वाळू वाहतूक करणारी वाहने, तसेच मोटार वाहन कायदा १९८८ मधील रस्ता सुरक्षिततेच्या अनुषंगाने आवश्यक नियमांचे पालन न केल्याने ही वाहने ब्लॅकलिस्ट करण्यात आली आहे. यापुढे अवैध गौण खनिज वाहतूक करणारी वाहने रस्त्यावर आढळून आल्यास कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

वाहने ब्लॅकलिस्ट परिवहन विभाग व महसूल विभागाच्या संयुक्त पथकाच्या तपासणीत १० वाहनांवर कारवाई करण्यात आली. वाहनांवर क्रमांक, रिफ्लेक्टर नसणे या कारणांवरून एकूण २ लाख ८८ हजार ५०० रुपये दंड वसूल करण्यात आला. प्रत्येक वाहनधारकास जवळपास ३० हजार रुपये दंड देत वसूल केला. तसेच, ही वाहने ब्लॅकलिस्ट करण्यात आली आहेत.- स्वप्नील माने, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, बीड

टॅग्स :BeedबीडCrime Newsगुन्हेगारी