शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

महसूल विभागाच्या पथकावर वाळू माफियांचा हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2019 23:48 IST

अवैध वाळू वाहतूक टिप्पर पकडल्याचा राग मनात धरून वाळू माफियांनी महसूलच्या पथकावर हल्ला चढविला. ही घटना धुळे- सोलापूर महामार्गावरील गेवराई तालुक्यातील पाडळसिंगीजवळ सोमवारी रात्री घडली.

ठळक मुद्देपाडळसिंगीजवळील घटना : गेवराई ठाण्यात ९ जणांवर गुन्हा नोंद

बीड : अवैध वाळू वाहतूक टिप्पर पकडल्याचा राग मनात धरून वाळू माफियांनी महसूलच्या पथकावर हल्ला चढविला. ही घटना धुळे- सोलापूर महामार्गावरील गेवराई तालुक्यातील पाडळसिंगीजवळ सोमवारी रात्री घडली. याप्रकरणी ९ जणांविरोधात गेवराई ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.वाळू तस्करी करणाऱ्या वाहनांवर कारवाईसाठी महसुलचे पथक पाडळसिंगी शिवारातील टोलनाक्याजवळ दबा धरुन बसले होते. वाळू घेऊन जाणारे टिप्पर (एमएच २३ एक्यू .३०००) पथकाने रात्री ११ वाजता रोखले. वाळू चोरीची असल्याचे निदर्शनास आल्याने नायब तहसीलदार अभय जोशी यांनी टिप्पर तहसील कार्यालयात घेऊन येण्यास सांगितले. त्यानंतर पाठीमागून एका जीपमधून आलेल्या प्रवीण राऊत व इतर अनोळखी ८ जणांनी महसूल पथकातील अधिकाऱ्यांना शिवीगाळ करुन मारहाण केली. मंडळ अधिकारी अंगद काशीद हे यात जखमी झाले. पथकात ए. ए. कुरडकर, तलाठी व्ही. एस. ससाणे, जी. एम. ढाकणे यांचा समावेश होता. त्यानंतर वाळूमाफियाांनी टिप्परसह तेथून पळ काढला.याप्रकरणी नायब तहसीलदार अभय जोशी यांच्या तक्रारीवरुन गेवराई ठाण्यात गौण खनिज अधिनियम व शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा नोंद केला. तपास फौजदार अरविंद गटकुळ करत आहेत.

टॅग्स :BeedबीडsandवाळूRevenue Departmentमहसूल विभाग