शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

समरीन खून प्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 01:10 IST

मुलीची तिच्या सासरच्या मंडळींनी हत्या केल्याचा आरोप करीत त्यांच्यावर राजकीय वरदहस्त असल्यामुळे योग्य तपास केला जात नाही. याविरुद्ध विविध संघटनांनी मिळून मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : येथील मुलीची तिच्या सासरच्या मंडळींनी हत्या केल्याचा आरोप करीत त्यांच्यावर राजकीय वरदहस्त असल्यामुळे योग्य तपास केला जात नाही. याविरुद्ध विविध संघटनांनी मिळून मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.१८ जुलै २०१९ रोजी येथील व्यावसायिक शेख लईक शेख उमर यांची कन्या समरीन हिचा तिच्या सासरच्यांनी खून केल्याची घटना घडली होती. त्यापूर्वी समरीने हिने तिच्या आईला फोन करुन आपल्या जीवाला धोका असल्याचे सांगितले होते. त्यानंतर शेख कुटुंबिय तात्काळ औरंगाबादकडे निघाले, मात्र ते त्याठिकाणी पोहचण्यापूर्वीच तिची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणात गुन्हा नोंद करण्यापासून अनेक अडचणी आल्या. राजकीय वरदहस्त असल्यामुळे आरोपींना अभय दिले जात असल्याचा आरोप मुलींच्या वडिलांनी केला तर याच विरोधात औरंगाबाद पोलीस प्रशासनाने योग्य कार्यवाही करावी, यासाठी बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर विविध संघटनांच्या वतीने मोर्चा काढण्यात आला.यावेळी विविध सामाजिक संघटनांनी या मोर्चात सक्रिय सहभाग नोंदवून जाहीर पाठिंबा दिला होता. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर यावेळी घोषणा देण्यात आल्या. तसेच विविध मागण्यांसह आरोपींना तात्काळ ताब्यात घेऊन योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आली. यावेळी महिलांनी देखील मोठ्या संख्येने मोर्चात सहभाग नोंदविला होता.

टॅग्स :Morchaमोर्चाMurderखूनBeed collector officeजिल्हाधिकारी कार्यालय बीड