बीड : लोकमत सखी मंच आणि संकल्प साडी यांच्यातर्फे घेतलेल्या जिल्हास्तरीय माझी साडी सुंदर साडी या स्पर्धेला सखींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या माध्यमातून सखींच्या आवडीची स्पर्धा पार पडली. स्पर्धेत सखींनी सुंदर साडी घातलेले फोटो पाठवले. यासाठी संकल्प साडी यांचे सहकार्य लाभले. यात संकल्प साडी फ्रेम आणि स्लोगन अनिवार्य होते.
सदस्यांना घरी राहूनच आनंद घेता येण्याची संधी लोकमत या माध्यमातून करीत आहे. बीड जिल्ह्यातील सखींनी यात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. विजेत्या सखींनी बक्षिसे घेण्यासाठी ९६५७१०२१७८ या क्रमाकांवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
लोकमत सखी मंच आवडीच्या विषयावर नेहमीच स्पर्धा घेत असते. याचे विशेष कौतूक वाटते. आणि संकल्प साडीला यात सहभागी घेऊन आम्हाला मोठा आनंद झाला आहे. सखी मंच नेहमीच पुढकार घेऊन स्पर्धा घेतात. विजेत्या सखींचे अभिनंदन.
सुनील पारीख,
संचालक, संकल्प साडीज्
माझी साडी सुंदर साडी स्पर्धेच्या विजेत्या सखी
प्रथम : सुचिता पोखरकर (परळी), द्वितीय : दीपा बाहेती (परळी), तृतीय : शुभांगी आनंदगावकर (माजलगाव)
उत्तेजनार्थ : अनुराधा खुरपे (माजलगाव), वैशाली पुरंदरे (बीड), मनीषा तोष्णीवाल (परळी), प्रतिभा तांबट (बीड), भाग्यश्री मालाणी (गेवराई)