शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

संत दिशा दाखवतात, बुवा दिशाभूल करतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 01:20 IST

मयूर देवकर। लोकमत न्यूज नेटवर्क आद्यकवी मुकुंदराज साहित्य नगरी (अंबाजोगाई) : समाजाला लागलेली बुवाबाजी कीड वाढल्याने संत साहित्याची संस्कारशीलता ...

ठळक मुद्देसंत साहित्याची संस्कारशीलता आणि बुवाबाजी याविषयी विचारमंथन

मयूर देवकर।लोकमत न्यूज नेटवर्कआद्यकवी मुकुंदराज साहित्य नगरी (अंबाजोगाई) : समाजाला लागलेली बुवाबाजी कीड वाढल्याने संत साहित्याची संस्कारशीलता जरी धोक्यात आली असली तरी संतांनी निर्माण केलेल्या संस्कारांमध्येच त्यापासून मुक्ती मिळण्याचा मार्ग आहे, असा निष्कर्ष ‘संत साहित्याने निर्माण केलेली संस्कारशीलता आजच्या बुवाबाजीने नष्ट केली आहे!’ या परिसंवादमध्ये काढण्यात आला. सतीश बडवे यांच्या अध्यक्षतेखाली सर्वज्ञ दासोपंत सभागृहात पार पडलेल्या या परिसंवादामध्ये विद्यासागर पाटांगणकर, सचिन परब, मार्तंड कुलकणी आणि शामसुंदर सोन्नर यांनी विचार मांडले.

मराठवाडा साहित्य संमेलनातील पहिल्या परिसंवादामध्येढोंगी बुवा आणि महाराजांचा सुळसुळाट, त्यातून होणारे समाजनैतिकतेचे होणारे पतन, बुवांनी चालविलेला आर्थिक व वैचारिक भ्रष्टाचार आणि यावरील उपाय याविषयी चिंतन करण्यात आले.मार्तंड कुलकर्णी यांनी संतसाहित्याचा अनुबंध जोडताना सांगितले की, बुवाबाजी ही काही आजची समस्या नसून शेकडो वर्षांपासून चालत आलेली आहे. परंतु, जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत संतांनी दिलेले संस्कार टिकून राहतील. कारण त्यांनी समाजाला दिशा दाखवण्याचे काम केले. परंतु, आजचे ढोंगी महाराज धर्म आणि भक्तीचा बाजार मांडून आर्थिक हव्यासापोटी समाजाची दिशाभूल करतात.वारकरी संप्रदायातील संत साहित्याचे महत्त्व विशद करताना शामसुंदर सोन्नर म्हणाले, समाजातील सर्व सुधारणावादी चळवळींचा उगम वारकरी संप्रदायातून झाली आहे. समतेचा विचार आणि विवेकशिल समाजनिर्माण झाला पाहिजे हा विचार वारकरी विचारातून आला आहे. परंतु, बुवाबाजीच्या माध्यमातून या विचारांचा गळा घोटण्याचे काम सुरू आहे. बुवा जर काही करत असतील, ते वैचारिक भ्रष्टाचार करत आहेत.

देशभरात असलेल्या बुवाबाबांच्या सुळसुळाटाला राजकारणीदेखील कारणीभूत आहेत. त्यांचा वरदहस्त अशा ढोंगी लोकांवर असतो. दोघांचा एकमेकांना फायदा होतो. त्यामुळे आपली ‘रुद्राक्ष’ संस्कृती आता ‘द्राक्ष’ संस्कृती होतेय, असे विद्यासागर पाटांगणकर म्हणाले. परिसंवादाच्या शेवटी बडवे अध्यक्षीय समारोपात म्हणाले की, संतांनी लोकसंवादी साहित्य निर्माण केले. चित्तशुद्धी आणि लोकोद्धार हे दोन हेतू ठेवून त्यांनी लिखाण केले.

महाराष्ट्रात जे चांगले झाले, ते संत साहित्यामुळेचसंत साहित्य हे त्या त्या काळातील धर्मांधता आणि बुवाबाजीच्या विरोधात केलेले बंड आहे, असे परब म्हणाले. ‘महाराष्ट्रात जे काही चांगले झाले आहे आणि होतेय ते केवळ संत साहित्यातून आलेल्या संस्कारांमुळेच शक्य झाले. संताचे नाव घेऊन वीरेंद्र बाबा, राधे माँ, रामरहीम बाबा, आसाराम बापू यांसारखे बाबा संतांचे विचार सांगत नाहीत. त्यांच्या कुकर्माने संताचे नाव बदनाम होतेय.’