शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

सांगितले जुळे निघाले तिळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 00:18 IST

एक महिला प्रसव वेदनेने स्वारातीच्या प्रसुती कक्षात दाखल झाली. या महिलेच्या जुन्या खाजगी दवाखान्यातील तीन सोनोग्राफीमध्ये जुळ्यांचा गर्भ असल्याचे सांगितले होते.

ठळक मुद्देमिताली गोलेच्छा यांनी केली शस्त्रक्रिया

अंबाजोगाई : एक महिला प्रसव वेदनेने स्वारातीच्या प्रसुती कक्षात दाखल झाली. या महिलेच्या जुन्या खाजगी दवाखान्यातील तीन सोनोग्राफीमध्ये जुळ्यांचा गर्भ असल्याचे सांगितले होते. डॉ. मिताली यांनी महिलेची तपासणी केली असता पहिले बाळ आडवे असल्या कारणाने महिलेवर सीझर करण्याचा निर्णय घेतला. तीन वर्षांनंतर या महिलेची प्रथमच गर्भधारणा होती.शस्त्रक्रियेदरम्यान पहिल्या आडव्या बाळाची प्रसुती केल्यानंतर दुसऱ्या बाळाची पायाळू प्रसुती करण्यात आली. त्यानंतर तिसºया बाळाची हालचाल डॉक्टरांना जाणवली. तेव्हा डॉ. मिताली यांनी त्या बाळाची पायाळू पद्धतीने प्रसुती केली. तिळ्यांचा गर्भ असल्याने सदरील महिलेला अती रक्तस्त्राव होऊ लागला पण डॉ. मिताली यांनी यशस्वी शस्त्रक्रिया व उपचार करून महिलेचे प्राण वाचवले.जुळ्यांचा गर्भ असून तिळे जन्माला आल्याचे पाहून रु ग्ण व नातेवाईकांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला आणि आनंद द्विगुणित ऐवजी त्रिगुणित झाला. सध्या या बाळामधील एक मुलगी २ किलो वजनाची असून आईच्या कुशीत सुखरूप आहे तर १.५ किलो वजनाच्या दोन मुलांवर कमी वजन असल्याने उपचार सुरू आहेत. या शस्त्रक्रि येत डॉ. मिताली गोलेच्छा यांना डॉ. प्रियंक सिंह दासीला, डॉ.पूनम देसाई, डॉ. अर्चना, डॉ.अभिजित, स्टाफ जयश्री, भूलतज्ज्ञ डॉ. देवानंद पवार यांचे सहकार्य मिळाले. या कार्यासाठी डॉ. सुधीर देशमुख, डॉ.संजय बनसोडे, डॉ. तोंडगे यांनी स्वागत केले.वंध्यत्व निवारण व गर्भधारणेच्या गोळ्यांमुळे तिळ्यांच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत आहे . आणि हे बाळ बºयाचदा आडवे किंवा पायाळू असल्यामुळे सीझर करावे लागते. तसेच प्रसुतीपश्र्चात अति रक्तस्त्राव होण्याचा धोका संभवतो.- डॉ.मिताली गोलेच्छा

टॅग्स :BeedबीडAmbajogaiअंबाजोगाईhospitalहॉस्पिटल