शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

रुईकर कुटुंबीयांचं पालकत्व स्विकारलं, मंत्री एकनाथ शिंदेंनी आर्थिक मदतही दिली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2021 22:55 IST

उद्धव ठाकरे यांच्या दीर्घायुष्यासाठी सुमंत रुईकर (Sumant Ruikar) व त्यांच्या मित्रासह तिरुपती बालाजीकडे पायी निघाले होते. सुमंत रुईकर यांना तिरुपतीकडे जाताना ताप आल्याने कर्नाटकातील रायचूर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले

ठळक मुद्देसोमवारी शिवसेना नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी 5 लाख रुपयांची रोख मदत केल्यानंतर आज शिवसेना नेते नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनीही 5 लाख रुपयांची तात्पुरती मदत पोहच केली

मुंबई/बीड - राज्याचे मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांना दीर्घायुष्य लाभावे यासाठी बीडमधील एका कट्टर शिवसैनिकाने तिरुपती बालाजीपर्यंत पदयात्रा काढली होती. पण, या पदयात्रेदरम्यान त्या शिवसैनिकाचे निधन झाले आहे. या शिवसैनिकाच्या घरी जाऊन शिवसेना नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी सांत्वन करत पीडित कुटुंबीयांना 5 लाख रुपयांची आर्थिक मदतही केली. त्यानंतर, आता मंत्री एकनाथ शिंदे यांनीही 5 लाख रुपयांची आर्थिक मदत देऊ केली आहे.  

उद्धव ठाकरे यांच्या दीर्घायुष्यासाठी सुमंत रुईकर (Sumant Ruikar) व त्यांच्या मित्रासह तिरुपती बालाजीकडे पायी निघाले होते. सुमंत रुईकर यांना तिरुपतीकडे जाताना ताप आल्याने कर्नाटकातील रायचूर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. प्रकृती खालावल्याने रुईकर यांचे शनिवारी दुपारी निधन झाले. त्यांच्या निधनामुळे त्यांचे मूळ गाव असलेल्या बीड शहरात हळहळ व्यक्त केली. तर, राज्यभरातील शिवसैनिकांनीही दु:ख व्यक्त केलं आहे. 

तिरूपतीला जाताना मृत्युमुखी पडलेल्या सुमंत रूईकर यांच्या कुटुंबियांना आधार देण्यासाठी शिवसेनेकडून मदतीचा ओघ सुरू आहे. सोमवारी शिवसेना नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी 5 लाख रुपयांची रोख मदत केल्यानंतर आज शिवसेना नेते नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनीही 5 लाख रुपयांची तात्पुरती मदत पोहच केली. तसेच, या पीडित कुटुंबीयांचं पालकत्व ठाणे जिल्हा शिवसेनेच्यावतीने स्विकारण्यात येत असल्याचंही त्यांनी जाहीर केलं आहे.  दरम्यान, पुढील आठवडाभरात एकनाथ शिंदे हे रूईकर कुटुंबियांना भेटण्यासाठी बीडमध्ये दाखल होणार आहेत, अशी माहितीही संबंधित शिवसेना नेत्यांकडून देण्यात आली. यावेळी, एकनाथ शिंदेंनी व्हिडिओ कॉलद्वारे पीडित कुटुंबींशी संवाद साधत त्यांचे सांत्वन केले.  

तिरुपतीला पोहोचण्यापूर्वीच मृत्यूसुमंत रुईकर यांनी बीड ते तिरुपती असा 1100 किमी पायी चालत जाण्याचा निश्चय केला होता. 1 डिसेंबरला ते तिरुपतीच्या दिशेने निघाले होते. उद्धव ठाकरे यांची प्रकृती ठिक व्हावी आणि शिवसेनेला आगामी निवडणुकांमध्ये यश मिळावे यासाठी रुईकर चालत जात होते. 31 डिसेंबरपर्यंत त्यांना तिरुपतीला पोहचण्याचा संकल्प होता. पण, ताप आल्यामुळे वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.

यापूर्वीही केली होती पायी यात्रासुमंत रुईकरांच्या मृत्युने बीड शहरात हळहळ व्यक्त होत आहे. सुमंत रूईकर यांनी यापूर्वी 2019 मध्ये उध्दव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी बीड ते तिरुपती पायी यात्रा केली होती. मुख्यमंत्री झाल्यानंतर उध्दव ठाकरेंनी सुमंत रुईकर यांचा कौतुक करत सत्कार केला होता. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाMumbaiमुंबईBeedबीडEknath Shindeएकनाथ शिंदे