बीड : महिला दिनाचे औचित्य साधून जिल्हा रुग्णालयातील अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक यांचा पदभार आशाताई रुबिना खान यांच्याकडे, तर मेट्रनचा पदभार अन्विता दळवीकडे सोपविण्यात आला. तसेच इतर परिचारिकांचाही जिल्हा शल्यचिकित्सकांकडून सत्कार करण्यात आला.
महिला दिनाच्यानिमित्ताने जिल्हा रुग्णालयातील कारभार काही वेळेसाठी महिलांच्या हाती देण्यात आला होता. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सूर्यकांत गित्ते यांनी सर्व परिचारिकांचा सत्कार केला. तसेच अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या खुर्चीवर कोरोना लसीकरण मोहिमेतील कर्तव्यावर असणाऱ्या आशाताई रुबीना शेख यांना बसविण्यात आले. त्यांचा डॉ. गित्ते यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कारही केला. त्यानंतर मेट्रन संगीता दिंडकर यांनीही आपला पदभार कोरोना वॉर्डमध्ये कर्तव्य बजावणाऱ्या अन्विता दळवी या परिचारिकेकडे सोपविला.
यावेळी डॉ. गित्ते यांच्यासह डॉ. सुखदेव राठोड, डॉ. सचिन आंधळकर, मेट्रन संगीता दिंडकर, विजया शेळके, संगीता महानवर, संगीता सिरसाट, संगीता क्षीरसागर, स्वाती माळी, वंदना उबाळे, सविता वाजपेयी, विरुमती साने, सुनीता यादव, शारदा डहाळे, स्वाती मुंडे, राजेंद्र औचरमल, सुशील जाधव, भागवत गिरी, अक्षय सोनटक्के आदींची उपस्थिती होती.
===Photopath===
080321\082_bed_2_08032021_14.jpeg
===Caption===
एसीएसचा पदभार रूबीना खान यांच्याकडे साेपविल्यानंतर सत्कार करताना जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सूर्यकांत गित्ते. सोबत डॉ.सुखदेव राठोड, डॉ.सचिन आंधळकर, मेट्रन संगिता दिंडकर.