शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

बीड जिल्ह्यात ४३० कोटींची कर्जमाफी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 00:05 IST

मोठ्या प्रतीक्षेनंतर छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेंतर्गत बीड जिल्ह्यातील ८९ हजार २८४ कर्जदार शेतक-यांचा सातबारा कोरा झाला असून, ४३० कोटी ५० लाख रुपये मंजूर होऊन बुधवारपासून पुढील प्रक्रिया सुरु झाली आहे.

ठळक मुद्देलवकरच निधी होणार वर्ग, खाते बेबाकचा मिळणार मेसेज

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : मोठ्या प्रतीक्षेनंतर छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेंतर्गत बीड जिल्ह्यातील ८९ हजार २८४ कर्जदार शेतक-यांचा सातबारा कोरा झाला असून, ४३० कोटी ५० लाख रुपये मंजूर होऊन बुधवारपासून पुढील प्रक्रिया सुरु झाली आहे.८९ हजार २५३ पैकी ४० हजार १८८ लाभार्थी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेचे असून उर्वरित लाभार्थी राष्टÑीयकृत बॅँकांचे आहेत.

शासनाने कर्जमाफीचा निर्णय घेतल्यानंतर निकष ठरविले होते. त्याची छाननी करण्यात बॅँकांचा वेळ गेला. नंतर आयटी सेंटरकडून मागविली जाणारी माहिती, सॉफ्टवेअरमधील बदलामुळे विलंब होत असल्याने सरकारवर टिकेची झोड उठली. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील ३ लाख ७ हजार ६४ शेतकरी पात्र ठरले होते. यात २००९ ते २००१६ पर्यंतच्या कर्जदार शेतक-यांचा समावेश आहे.१ डिसेंबर रोजी बीड जिल्हा दौºयावर असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वडवणी येथील कार्यक्रमात जिल्ह्यातील दोन लाख शेतक-यांचे ८०० कोटी रुपये माफ होतील असे संकेत दिले होते. त्यामुळे आशा पल्लवीत झाल्या होत्या. आतापर्यंत तीन ग्रीन लिस्ट जारी झाल्या होत्या. आॅक्टोबरमध्ये पहिला टप्पा, २४ नोव्हेंबर रोजी दुसरा टप्पा तर तिसरा टप्पा ६ डिसेंबर रोजी याप्रमाणे ग्रीन लिस्ट प्राप्त होऊन तो निधी बॅँकांना मंजूर झाला. संबंधित कर्जदार शेतकºयाच्या खात्यावर तो जमा करुन खाते बेबाक करण्यात आले.

जिल्हा बँकेचे ४० हजार १८८ लाभार्थीजिल्ह्यातील अकरा बॅँकांतील पात्र ८९ हजार २८३ शेतकरी कर्जदारांना ४३० कोटी रुपये मंजूर झाले आहेत. शासन निर्देशानुसार पुढील प्रक्रिया बॅँकेमार्फत होईल, असे जिल्हा अग्रणी बॅँकेचे व्यवस्थापक विजय चव्हाण यांनी ‘लोकमत’ला सांगितले.