शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

१५ किलोच्या वांग्यांच्या कॅरेटला ३५ रुपयांचा भाव; पिक जोरदार मात्र तोडणीचा खर्चही निघेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 14:31 IST

आता वांगे मोठ्या प्रमाणात आले असल्याने व ते तोडणी करण्याच्या वेळेलाच अडचणी आल्या आहेत.

ठळक मुद्देवाढत्या कोरोना रोगाच्या प्रादुर्भावामुळे बाजार बंद असल्याने वांगी कुठे विकावी, असा प्रश्नवांग्यांचा माल व्यापारी घेतात. मात्र, तो कवडीमोल भावाने.

- सखाराम शिंदे

गेवराई : तालुक्यातील धोंडराई येथील शेतकरी संतोष ढोले यांनी त्यांच्या अर्धा एकर शेतात दीड महिन्यापूर्वी वांग्याची लागवड केली होती. सध्या हे पीक जोरदार आले असून, आता वांग्याची फळे निघण्याची वेळ आली असता, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बाजार बंद असल्याने ठोक व्यापाऱ्यांकडून वांग्यांच्या १२ ते १५ किलोचे कॅरेटला फक्त ३० ते ४० रुपये भाव मिळत आहेत. त्यामुळे झालेला खर्च तर सोडा, वांगे तोडणीला लावलेल्या मजुरांचे पैसेही निघत नसल्याचे धोंडराई येथील शेतकरी संतोष ढोले यांनी सांगितले.

संतोष ढोले यांनी अर्धा एक्कर जमिनीत केलेल्या वांगीच्या लागवडीवर ३० ते ३५ हजार रुपये खर्च केला. आता वांगे मोठ्या प्रमाणात आले असल्याने व ते तोडणी करण्याच्या वेळेलाच अडचणी आल्या आहेत. वाढत्या कोरोना रोगाच्या प्रादुर्भावामुळे बाजार बंद असल्याने वांगी कुठे विकावी, असा प्रश्न ढोले यांना पडला. वांग्यांचा माल व्यापारी घेतात. मात्र, तो कवडीमोल भावाने. यात १२ ते १५ किलोच्या कॅरेटला फक्त ३५ रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. दोन रुपये किलो भाव मिळत असल्याने, झालेला खर्च सोडा, पण वांगी तोडणीला लावलेल्या मजुराचे पैसे निघणे अवघड झाल्याचे ढोले म्हणाले.मागील वर्षी मार्चमध्ये एक एकरात भेंडीची लागवड केली होती. याला खर्च मोठ्या प्रमाणात केला. मात्र, कोरोना रोगाच्या प्रादुर्भावामुळे लाॅकडाऊन झाले. सर्व काही बंद झाल्याने भाजी पिकांसाठी केलेला खर्चही निघाला नव्हता, असा अनुभव त्यांनी सांगितला.

आंतरपीक फुलकोबीला भाव मिळेनावांगीच्या पिकात आंतरपीक म्हणून फुलकोबीची लागवड केली होती. मात्र, भाव न मिळाल्याने ती फुलकोबी तोडून जनावरांना टाकावी लागली. या वर्षी कोरोनामुळे बाजार बंद नसते, तर वांग्यातून दीड ते दोन लाख रुपये उत्पन्न मिळाले असते. मागील वर्षी पण भेंडीचे नुकसान झाले, तर आता वांग्याचे काटे शेतकऱ्यालाच टोचू लागले आहेत. 

टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र