शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

हरभरा, तुरीचे थकलेले १३ कोटी रुपये मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 00:03 IST

जिल्ह्यात दुष्काळाच्या दाहकतेची तीव्रता वाढली असून, पाणी, चारा आणि मजुरांच्या हाताला काम, अशा विविध प्रश्नांवर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी दुष्काळी आढावा बैठकीत विविध मागण्यांचे निवेदन आ.जयदत्त क्षीरसागर यांनी दिले. या मागण्यांना मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली

ठळक मुद्देचार दिवसांत मिळणार रक्कम : क्षीरसागरांनी मांडली दुष्काळाची दाहकता

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्ह्यात दुष्काळाच्या दाहकतेची तीव्रता वाढली असून, पाणी, चारा आणि मजुरांच्या हाताला काम, अशा विविध प्रश्नांवर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी दुष्काळी आढावा बैठकीत विविध मागण्यांचे निवेदन आ.जयदत्त क्षीरसागर यांनी दिले. या मागण्यांना मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली असून दुष्काळाबाबत शासनाने तातडीने उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे हरभरा व तुरीचे १३ कोटी रुपये मंजूर झाले असून ते तातडीने शेतकºयांना येत्या चार दिवसांत मिळतील, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे आ.क्षीरसागर यांनी सांगितले.सिंचन प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात विहिरी घेऊन त्यावर तात्पुरती पाणी पुरवठा योजना मंजूर करावी, ही मागणी मुख्यमंत्र्यांनी गांभिर्याने घेत तातडीने व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सचिवांशी बोलून विभागीय आयुक्तांना याबाबतच्या डिजाईन आणि अंदाजपत्रक तयार करण्याचे आदेश दिले. जिल्ह्यात जलयुक्त शिवारचा निधी दुप्पट करावा, राशन दुकानातून सवलतीच्या दरात अन्न धान्य उपलब्ध करून देऊन भूमिहीन शेतकरी, शेतमजूर यांना माणसी २० किलो गहू व १५ किलो तांदूळ देण्यात यावा, या मागणीला मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक होकार देऊन त्यास मंजुरी दिली. जिल्ह्यात एम.आर.ई.जी.एस. अंतर्गत शेतकºयांसाठी देण्यात येणाºया विहिरी इष्टांक वाढवून देण्यात याव्यात. ज्या प्रकल्पात पाणीसाठा आहे ते पाणी पिण्यासाठी आरक्षीत करून पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देण्यात यावे, जुन्या रोहयो नुसार कामे चालू करावीत, तातडीने छावण्या उघडून किंवा दावणीला चारा उपलब्ध करून द्यावा. दुधाला ५ रुपये दरवाढ करण्यात आली होती ही मुदत आता संपत असून ही दरवाढ पुढेही चालू ठेवावी. राज्यातील दुष्काळी भागात इफको व गोदरेज कंपन्यांकडून पशुखाद्य उपलब्ध करून द्यावे. गतवर्षी खरेदी केलेल्या हरभरा व तुरीचे थकित १३ कोटी रुपये तातडीने द्यावेत, अशी मागणी केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी हे पैसे वर्ग करण्यात येतील असे सांगितले. मराठवाड्यात गोदावरी खोºयात २५० सिंचन प्रकल्पाला मंजुरी देण्याची मागणीही आ.क्षीरसागर यांनी केली आहे. याबाबत तातडीने सर्वेक्षण करून प्रस्ताव शासनाकडे पाठवण्याचे आदेश देण्यात आले. सिंदफना, कुंडलिका, मांजरा, वाण व मनार या नदीच्या खोºयात कायमस्वरूपी शास्वत पाणी मिळावे, यासाठी सर्वेक्षणाकरीता २० कोटीची तरतूद करावी व बीड, गेवराई, माजलगाव शहराला पिण्याचे पाणी मिळावे यासाठी जायकवाडी प्रकल्पातून 3 टीएमसी पाणी माजलगाव धरणात सोडण्यात यावे. सध्या बीड शहरात अमृत अटलचे काम प्रगतीपथावर असून या कामासाठी लागणारा निधी उपलब्ध करावा अशी मागणी केली असता या कामासाठी निधीची कमतरता पडणार नाही असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

टॅग्स :BeedबीडAgriculture Sectorशेती क्षेत्रDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसJaydutt Kshirsagarजयदत्त क्षीरसागर